
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर भारतीय महिला संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा उतरणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघ फेब्रुवारीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यात टी20, वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. तीन सामन्यांची टी20 मालिका, तीन सामन्यांची वनडे मालिका आणि एक कसोटी सामना खेळणार आहे. वनडे आणि टी20 मालिकेसाठी बीसीसीआय निवड समितीने संघाची घोषणा आधीच केली होती. आता एका कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे. हा कसोटी सामना 6 मार्च ते 9 मार्च दरम्यान असणार आहे. या कसोटी संघात वनडे वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान जखमी झालेल्या प्रतिका रावल हिची निवड झाली आहे. प्रतिका रावल साडे चार महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे तिच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत तिने चांगली कामगिरी केली होती. पण उपांत्य आणि अंतिम फेरीत दुखापतीमुळे खेळली नव्हती. तिच्या जागी शफाली वर्माला संधी मिळाली होती.
प्रतिका रावल टी20 आणि वनडे मालिकेचा भाग नसेल. सध्या वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतही खेळत नाही. बीसीसीआयच्या मते, प्रतिका कसोटी सामन्यापर्यंत फिट अँड फाईन होईल. त्यामुळेच तिची संघात निवड केली गेली आहे. कसोटी संघात काही खेळाडू पहिल्यांदा उतरणार आहेत.तीन युवा खेळाडूंना पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान मिळालं आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. युवा अष्टपैलू खेळाडू अमनजोत कौर आणि युवा वेगवान गोलंदाज क्रांती गौड यांचं नाव आहे. त्यांनी टी20 आणि वनडे संघात जबरदस्त कामगिरी केली आहे. वनडे वर्ल्डकप विजयात त्यांचा मोलाचा वाटा होता. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी 20 वर्षीय डावखुरी फिरकीपटू वैष्णवी शर्मा हीलाही संधी दिली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, अमनजोत कौर, ऋचा घोष (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ति शर्मा, रेणुका सिंह, स्नेह राणा, क्रांति गौड, वैष्णवी शर्मा आणि सयाली सतघरे.