
वूमन्स टीम इंडियाने दुसऱ्या आणि करो या मरो अशी स्थिती असलेल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध धमाकेदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने कांगारुंचा 102 धावांनी धुव्वा उडवला आहे. उपकर्णधार स्मृती मंधाना हीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 293 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर कांगारुंना पूर्ण 50 ओव्हरही टिकता आलं नाही. टीम इंडियाने कांगारुंना 40.5 ओव्हरमध्ये 190 रन्सवर गुंडाळलं. कांगारुंना रोखण्यात क्रांती गौड हीने निर्णायक भूमिका बजावली. क्रांतीने सर्वाधिक सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर इतरांनीही चांगली साथ दिली. टीम इंडियाने या विजयासह पहिल्या पराभवाची परतफेड केली आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. त्यामुळे उभयसंघात होणारा तिसरा आणि अंतिम सामना चांगलाच रंगतदार होण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाकडून जवळपास 300 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एकीलाही अर्धशतक करता आलं नाही. ऑस्ट्रेलियासाठी फक्त दोघींनाच 20 पार मजल मारता आली. तर टीम इंडियाने इतरांना 17 धावांच्या आतच रोखलं.
ऑस्ट्रेलियासाठी अनाबेल सदरलँड हीने सर्वाधिक 45 धावा केल्या. तर एलिसा पेरी हीने 44 धावांचं योगदान दिलं. तर इतरांनी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. टीम इंडियासाठी क्रांती व्यतिरिक्त दीप्ती शर्मा हीने 2 विकेट्स मिळवल्या. तर रेणुका ठाकुर सिंह, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी आणि राधा यादव या चौघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने या संधीचा फायदा घेत 290 पार मजल मारली. मात्र टीम इंडिया संपूर्ण 50 ओव्हर खेळू शकली नाही. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 49.5 ओव्हरमध्ये 292 रन्सवर ऑलआऊट केलं.
ऑस्ट्रेलियाचा 102 धावांनी धुव्वा, टीम इंडिया विजयी
And that’s how it is done 😎 🔥#TeamIndia comprehensively win the 2️⃣nd ODI by 102 runs and level the 3 match series 1️⃣-1️⃣
Scorecard ▶️ https://t.co/64x1QjUHl9#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/lXaEYxrqKq
— BCCI Women (@BCCIWomen) September 17, 2025
टीम इंडियासाठी स्मृतीने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. स्मृती मंधाना हीने शतकी खेळी केली. स्मृतीने 128.57 च्या स्ट्राईक रेटने 91 बॉलमध्ये 117 रन्स केल्या. स्मृतीने या दरम्यान 4 षटकार आणि 14 चौकार लगावले. स्मृती व्यतिरिक्त दीप्ती शर्मा हीने 40 धावांचं योगदान दिलं. रिचा घोष हीने 29, प्रतिका रावल 25 आणि स्नेह राणा हीने 24 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन हरमनप्रीतला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. हरमनप्रीतने 17 धावा केल्या. तर हर्लीन देओलने 10 धावा जोडल्या. तर इतरांनी दिलेल्या योगदानामुळे भारताने 292 धावांपर्यंत मजला मारली.
दरम्यान भारताने या विजयासह मालिकेत 1-1 ने बरोबरीत साधली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासह कोणता संघ मालिका जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. अंतिम सामना शनिवारी 20 सप्टेंबरला होणार आहे.