AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs AUSW : स्मृती मंधानाचं विक्रमी शतक, 77 चेंडू आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खास रेकॉर्डची नोंद

वनडे मालिकेतील दुसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु आहे. या सामन्यात भारताकडून सलामीला आलेल्या स्मृती मंधानाने जबरदस्त खेळी केली. तिने 91 चेंडूत 117 धावा केल्या. यासह खास विक्रमाची नोंद केली. काय ते जाणून घ्या.

INDW vs AUSW : स्मृती मंधानाचं विक्रमी शतक, 77 चेंडू आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खास रेकॉर्डची नोंद
INDW vs AUSW : स्मृती मंधानाचं विक्रमी शतक, 77 चेंडू आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खास रेकॉर्डची नोंदImage Credit source: Pankaj Nangia/Getty Images
| Updated on: Sep 17, 2025 | 4:21 PM
Share

IND W vs AUS W : भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मंधाना जबरदस्त फॉर्मात आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी तिचा हा फॉर्म टीम इंडियासाठी जमेची बाजू ठरणार आहे. असं असताना स्मृती मंधानाने पुन्हा एकदा जबरदस्त खेळी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. या सामन्यात तिचा आक्रमक अंदाज दिसून आला. तिने गोलंदाजांना धू धू धुतलं. इतकंच काय तर पहिल्या विकेटसाठी प्रतीक्षा रावलसोबत अर्धशतकी भागीदारी देखील केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने शतक ठोकत नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. स्मृती मंधानाने तिच्या क्रिकेट कारकिर्दीतील हे 12वं शतक ठोकलं आहे. तिने न्यूझीलंडच्या सुझी बेट्स आणि इंग्लंडच्या टॅमी ब्यूमोंट यांच्याशी बरोबरी केली. एकदिवसीय शतके करणाऱ्यांच्या यादीत मंधाना संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिच्या पुढे फक्त मेग लॅनिंग (15) आणि बेट्स (13) या दोघी आहेत.  स्मृती मंधानाची कामगिरी अशीच सुरु राहिली तर वनडे वर्ल्डकप स्पर्धेत नक्कीच ती या दोघांचा विक्रम मोडीत काढेल. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत तिच्याकडून क्रीडाप्रेमींना फार अपेक्षा आहेत.

मंधानाचे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सर्वात जलद शतक आहे.स्मृती मंधानाने फक्त 77 चेंडूत शतक ठोकलं. भारतीय महिला फलंदाजाकडून ठोकलेलं दुसरे सर्वात जलद शतक आहे. भारतीय फलंदाजाकडून सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रमही साउथपॉच्या नावावर आहे. तिने आयर्लंडविरुद्ध 70 चेंडूत हा विक्रम केला होता. 47 पेक्षा अधिक सरासरीने 4700 पेक्षा जास्त धावा काढणारी मंधाना सर्व महिला सलामीवीरांमध्ये धावांच्या बाबतीत बेट्सनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, मंधाना या सामन्यात 91 चेंडू खेळली आणि 14 चौकार आणि 4 षटकार मारून 117 धावा करून बाद झाली. तहिला मॅकग्राथच्या गोलंदाजीवर एशले गार्डनरने तिचा झेल घेतला.

जूनमध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या टी20 मालिकेत मंधानाने तिचे पहिले टी20 शतक झळकावलं होतं. त्यामुळे महिला क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये शतके झळकावणारी पहिली भारतीय ठरली. दुसरीकडे, मंगळवारी जाहीर झालेल्या आयसीसी महिला एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधानाने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.