IPL 2021: राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनला 12 लाखांचा दंड, नेमकं कारणं काय?

| Updated on: Sep 22, 2021 | 8:38 AM

राजस्थान रॉयल्सला पंजाब विरुद्ध रोमहर्षक मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतरही फटका बसला आहे. टीमचा कॅप्टन संजू सॅमसनला स्लो ओव्हररेटमुळं दंड झाला आहे.

IPL 2021: राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनला 12  लाखांचा दंड, नेमकं कारणं काय?
संजू सॅमसन
Follow us on

दुबई: आयपीएल या जगातील सर्वात मनोरंजनात्मक क्रिकेट लीगमध्ये 21 सप्टेंबरला झालेल्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यातील सामन्यात राजस्थानने रोमहर्षक असा विजय मिळवला. दुबईच्या मैदानात दोन्ही संघानी आयपीएल 2021 (IPL 2021) पर्वाची सुरुवात आजच्या सामन्याने केली होती. एका क्षणी राजस्थानने सामना गमावलाच असे वाटत असताना अखेरच्या षटकात चमत्कार व्हावा तशी राजस्थानच्या कार्तिक त्यागीने (Kartik Tyagi) गोलंदाजी केली. पंजाबला विजयासाठी आवश्यक 4 धावा रोखत कार्तिकने 2 विकेटही घेतले. यासोबतच राजस्थान संघाने 2 धावांनी विजय मिळवला. मात्र, दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसनला स्लो ओव्हररेट मुळं दंड बसला आहे. आयपीएल मॅनेजमेंटनं संजू सॅमसनला यासंदर्भात मॅच संपल्यानंतर माहिती दिली.

संजू सॅमसनला 12 लाखांचा दंड

राजस्थान रॉयल्सला पंजाब विरुद्ध रोमहर्षक मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतरही फटका बसला आहे. टीमचा कॅप्टन संजू सॅमसनला स्लो ओव्हररेटमुळं दंड झाला आहे. आयपीएल मॅनेजमेंटनं संजू सॅमसनला 12 लाखांचा दंड केला आहे. संजू सॅमसनला हा दंड भरावा लगणार आहे. मात्र, पंजाबवर मिळवलेल्या विजयामुळं राजस्थान रॉयल्सनं गुणतालिकेत 5 व्या स्थानावर झेप घेतली आहे.

कार्तिकचा चमत्कार, राजस्थानचा विजय

पंजाबसमोर 186 धावांचे मोठे लक्ष्य होते. पण सुरुवातीलाच सलामीवीर मयांक आणि राहुलने शतकी भागिदारी करत संघाला विजय अगदी सोपा केला. त्यानंतर पूरननेही देखील बऱ्यापैकी उर्वरीत जबाबदारी पार पाडली. पण अखेरच्या ओव्हरमध्ये पंजाबला विजयासाठी केवळ चार धावांची गरज असताना अक्षरश: चमत्कार घडला. गोलंदाजीला आलेला नवखा गोलंदाज कार्तिक त्यागीने संघाला चमत्कारीक असा विजय मिळवून दिला. पंजाबनं 20 ओव्हरमध्ये 4 विकेटमध्ये 183 धावा केल्या.

‘अनलकी’ यशस्वी!

सामन्यात राजस्थान संघाला उत्तम सुरुवात करुन देणारा फलंदाज यशस्वीला त्याच अर्धशतक मात्र पूर्ण करता आलं नाही. अवघ्या एका धावेने यशस्वीचं अर्धशतक हुकलं. सुरुवातीपासून अप्रतिम फलंदाजी करणाऱ्या यशस्वीला अर्धशतकाच्या जवळ पोहचताच काहीशी अडचण येत असल्याचं दिसून येत होतं. इतक्या मोठ्या स्पर्धेत अवघ्या 19 वर्षीय यशस्वीला अर्धशतकाजवळ पोहचताच दडपण येणं स्वाभाविक होतं. याच दडपणामुळे हरप्रीत ब्रारच्या चेंडूवर तो चूकीचा शॉट खेळून बसला आणि मयांकने त्याचा झेल घेतला. यशस्वीने 36 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार ठोकतं 49 धावा केल्या.

अर्शदीपचा ‘पंच’

पंजाबला सामना गमवावा लागला असला तरी त्याचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने आजच्या सामन्यात भेदक गोलंदाजी करत तब्बल 5 विकेट खिशात घातले. त्याने संघाला सर्वात पहिलं यश मिळवून देत एविन लुईसला बाद केलं. त्यानंतर महत्त्वाचे असे लियम लिव्हिंगस्टोन, महिपाल लोमरोर यांच्या विकेट घेत संघाला मोठं यश मिळवून दिलं. अखेर शेवटच्या षटकात साकरिया आणि कार्तिक त्यागी यांना बाद करत त्याने एका सामन्यात पाच विकेट्स मिळवण्याचा सन्मान स्वत:च्या नावे केला.

इतर बातम्या:

इंग्लंडचा पाकिस्तान दौरा रद्द झाल्याचा IPL ला फायदा, चेन्नई सुपरकिंग्सचा संघ सर्वात आनंदी

IPL 2021: धोनी-रोहितला मागे टाकत कोहलीच्या नावे नवा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

वीरेंद्र सेहवागने उधळली स्तुतीसुमने, एमएस धोनीचा केला उदो उदो, म्हणाला…


Ipl 2021 rajasthan royals sanju samson fined for slow over rate during match against Punjab Kings