AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: धोनी-रोहितला मागे टाकत कोहलीच्या नावे नवा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

आयपीएल 2021 च्या उर्वरीत पर्वातील पहिल्याच सामन्यात विराट कोहलीला पराभव पत्करावा लागला असला तरी त्याने एक दमदाकर विक्रम स्वत:च्या नावे केला आहे.

IPL 2021: धोनी-रोहितला मागे टाकत कोहलीच्या नावे नवा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
विराट कोहली
| Edited By: | Updated on: Sep 21, 2021 | 4:11 PM
Share

IPL 2021: आरसीबीचा कर्णधार आणि फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने सोमवारी केकेआर विरुद्धच्या सामन्यात आयपीएलमधील एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला.  विशेष म्हणजे त्याने या रेकॉर्डने दिग्गज कर्णधार एमएस धोनी, रोहित शर्मा यानांही मागे टाकले आहे. तसंच असा रेकॉर्ड करणारा तो एकमेक खेळाडू आहे. विराट कोहलीने आयपीएलच्या इतिहासात एकाच संघाकडून तब्बल 200 सामने खेळण्याचा रेकॉर्ड केला आहे. केकेआर विरुद्धच्या 200 व्या सामन्यात विराट बॅटने कमाल करु शकला नाही. तो 5 धावा करुन बाद झाला पण त्याने हा दमदार रेकॉर्ड मात्र स्वत:च्या नावे केला.

आय़पीएल सुरु झाल्यापासून म्हणजे 2008 सालापासून विराट आरसीबी संघासोबत आहे. त्याने 192 डावांत 37.97 च्या सरासरीने 6 हजार 81  धावा केल्या आहेत. आरसीबीसाठी खेळताना विराटने पाच शतकं आणि 40 अर्धशतकं ठोकली आहेत. दरम्यान 200 सामने आरसीबीकडून खेळणारा विराट या पर्वानंतर आरसीबीचं कर्णधारपद सोडणार आहे. पण तरीदेखील तो याच संघाकडून खेळणार हेही त्याने स्पष्ट केलं आहे.

एकाच संघाकडून 200 सामने खेळणारा एकमेव खेळाडू

कोहली हा एकमेव खेळाडू आहे, ज्याने एकाच संघाकडून 200 सामने खेळले आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी 182 सामने सीएसकेकडून खेळत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर सुरेश रैना सीएसकेकडून 172 सामने खेळला आहे. याशिवाय आय़पीएलचे 200 सामने खेळणाऱ्यांमध्ये अव्वल क्रमांकावर एमएस धोनी (212), त्यानंतर रोहित शर्मा (207), दिनेश कार्तिक (203) आणिन सुरेश रैना (201) अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. यांच्यानंतर विराट (200) पाचव्या स्थानावर आहे.

2011 मध्ये प्रथम कर्णधार

कोहलीने 2011 साली राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या एका सामन्यात सर्वात पहिल्यांदा आरसीबीचं कर्णधारपद भूषवलं होतं. 2013 मध्ये अखेर त्याला कर्णधारपद सोपवण्यात आलं. त्या पर्वात कोहलीने अप्रतिम प्रदर्शन केलं होतं. यंदाच्या पर्वात आरसीबीने 8 सामन्यांपैकी 5 सामने जिंकत गुणतालिकेत तिसरं स्थान पटकावलं आहे.

10 हजार धावांच्या जवळ कोहली

यंदाच्या सीजनमध्ये आणखी एक रेकॉर्ड कोहीली नावावर करण्यासाठी सज्ज झाला आहे. कोहली पुढील काही सामन्यात काहीशा धावा करुन टी20 क्रिकेटमध्ये 10000 धावांचा डोंगर पार करु शकतो. या लक्ष्यापासून तो केवळ 66 धावाच दूर आहे. ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, शोएब मलिक आणि डेव्हीड वॉर्नर यांच्यानंतर या यादीत पोहोचमारा कोहली इतिहासातील पाचवा फलंदाज असेल.

हे ही वाचा

IPL 2021: केकेआरचा डॅशिंग विजय, 9 विकेट्सनी सामना घातला खिशात

पाकिस्तानची नाचक्की सुरुच! न्यूझीलंडनंतर इंग्लंडकडूनही दौरा रद्द

एकदिवसीय सामन्यात सुपर ओव्हरचा थरार, 6 चेंडूत 7 धावांचं सोपं टार्गेट, तरी शेवटच्या चेंडूपर्यंत चुरस कायम

(After kkr vs rcb match virat kohli become first player to play 200 ipl matches for a single team)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.