AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकदिवसीय सामन्यात सुपर ओव्हरचा थरार, 6 चेंडूत 7 धावांचं सोपं टार्गेट, तरी शेवटच्या चेंडूपर्यंत चुरस कायम

आयपीएलमध्ये सुपर ओव्हरची मजा कायम आपल्याला पाहायला मिळते. त्यात आयपीएलचे उर्वरीत सामने पुन्हा सुरु झाले असून या स्पर्धेआधी एका एकदिवसीय सामन्यात सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला आहे.

एकदिवसीय सामन्यात सुपर ओव्हरचा थरार, 6 चेंडूत 7 धावांचं सोपं टार्गेट, तरी शेवटच्या चेंडूपर्यंत चुरस कायम
वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यातील एक क्षण
| Edited By: | Updated on: Sep 20, 2021 | 8:47 PM
Share

मुंबई: युएईमध्ये आयपीएलच्या (IPL 2021) उर्वरीत हंगामाला सुरवात झाली आहे. या सामन्यांमध्ये कायम सुपर ओव्हरचा जलवा पाहायाला मिळत असतो. टी20 सामन्यात कायमच चुरशीचा खेळ होत असल्याने सुपर ओव्हर होत असतात. पण पुन्हा सुरु झालेल्या आयपीएलमध्ये सुपर ओव्हरचा थरार दिसण्यापूर्वीच परदेशात सुपर ओव्हरचा थरार पाहायाला मिळाला आहे. विशेष म्हणजे ही सुपर ओव्हर एकदिवसीय सामन्यात पाहायला मिळाली. हा सामना महिला क्रिकेट संघामध्ये झाला. वेस्ट इंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रीका या महिला क्रिकेट संघामध्ये सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पाचव्या सामन्यात ही सुपरओव्हर पाहायला मिळाली.

सामन्यात वेस्ट इंडीजच्या महिलांनी प्रथ्म फलंदाजी करत 5 विकेट्सच्या बदल्यात 192 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्च्या बदल्यात 192 धावाच केल्या. दोघांनी समान स्कोर केल्यामुळे मग सुपर ओव्हर खेळवून विजेता कोण हे ठरवण्यात आले.

दक्षिण आफ्रिकेने बनवल्या 6 धावा

सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करत दक्षिण आफ्रिका संघाने केवळ 6 धावा केल्या. पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यानंतर पुढील दोन्ही चेंडूवर एक एक धाव खघेत स्कोर 3 केला. त्यानंतर चौथा चेंडू डॉट पडल्यानंतर  5 व्या चेंडूवर दोन धावा घेतल्या आणि अखेरच्या चेंडूवर 1 धाव घेत आफ्रिकेने 6 धावा स्कोर बोर्डवर लावल्या. ज्यामुळे वेस्ट इंडिजला विजयासाठी अवघ्या 7  धावांचे सोपे लक्ष्य मिळाले.

वेस्ट इंडीजची पहिल्याच चेंडूवर विकेट

दक्षिण आफ्रिका संघाने अवघ्या 6 धावा केल्यानंतर गोलंदाजीत मात्र उत्तम प्रदर्शन केलं.पहिल्या चेंडूवर वेस्ट इंडिजच्या फलंदाजाला बाद केलं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा करत तिसऱ्या बॉलवर एक धाव घेतली. त्यानंतर चौथ्या चेंडूवर एक आणि पाचव्या चेंडूवर 2 धावा घेत स्कोर लेव्हल केला. त्यानंतर विजयासाठी केवळ एक धाव हवी होती पण चेंडूही एकच हातात होता. अशा चुरशीच्या क्षणी वेस्ट इंडिजच्या फलंदाजानी एक धाव घेत सामना जिंकला. हा सामना जिंकत व्हाईट वॉशपासून देखील संघाला वाचवले. याआधीचे 4 वनडे सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकत मालिका जिंकली होती. पण अखेरची वनडे वेस्ट इंडिजने जिंकली.

हे ही वाचा

AUSW vs INDW, 1st ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

T20 विश्वचषकानंतरचं भारतीय संघाचं वेळापत्रक जाहीर, 7 महिन्यांत 4 संघासोबत भिडणार, भारतीय भूमीत ‘या’ ठिकाणी होतील सामने 

जय शहांनी पेटारा उघडला, देशांतर्गत क्रिकेटपटूंना मालामाल करणार, एका खेळाडूला किती रुपये मिळणार?

(West indies women claim super over victory against south africa in 5th odi)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.