MS Dhoni Quits CSK Captaincy: कॅप्टन बनल्यानंतर जाडेजाची पहिली प्रतिक्रिया, ‘मला टेन्शन नाही, माझ्याकडे….’

MS Dhoni Quits CSK Captaincy: भारताचा अव्वल क्रिकेटपटू एमएस धोनीने आज (MS Dhoni Quits CSK Captaincy) चेन्नई सुपर किंग्सच कर्णधारपद सोडलं.

MS Dhoni Quits CSK Captaincy: कॅप्टन बनल्यानंतर जाडेजाची पहिली प्रतिक्रिया, मला टेन्शन नाही, माझ्याकडे....
IPL 2022: चेन्नई सुपर किंग्स, एमएस धोनी-रवींद्र जाडेजा
Image Credit source: twitter
| Updated on: Mar 24, 2022 | 6:46 PM

MS Dhoni Quits CSK Captaincy: भारताचा अव्वल क्रिकेटपटू एमएस धोनीने आज (MS Dhoni Quits CSK Captaincy) चेन्नई सुपर किंग्सच कर्णधारपद सोडलं. IPL स्पर्धा सुरु व्हायला दोन दिवस उरलेले असताना, धोनीने हा निर्णय घेतला. धोनीचा हा निर्णय चाहत्यांसाठी नक्कीच धक्कादायक आहे. पण धोनीला ओळखणाऱ्या माणसांना या निर्णयाचं अजिबात आश्चर्य वाटलेलं नाही. कारण एमएस धोनी जेव्हा कुठला मोठा निर्णय घेतो, तेव्हा त्यामागे विचार असतो, प्लानिंग असते. आज धोनीने कॅप्टनशिप सोडताना, सहकारी रवींद्र जाडेजाकडे (Ravindra jadeja) CSK ची कॅप्टनशिप सोपवली. रवींद्र जाडेजा 2012 पासून चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतोय. धोनीसोबत तो भारतीय संघातही खेळलाय. अनेकदा अटी-तटीच्या सामन्यांमध्ये जाडेजाच धोनीला साथ देण्यासाठी मैदानावर असायचा. सीएसकचे (CSK) नेतृत्व करणारा तो तिसरा कॅप्टन आहे. कॅप्टन म्हणून जाडेजाची निवड झाल्यानंतर त्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

गुणी क्रिकेटपटूच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

रवींद्र जाडेजा प्रतिभावान क्रिकेटपटू आहे, यात कुठलीही शंक नाही. भारताचा तो एक ऑलराऊंडर प्लेयर आहे. संघाला गरज असताना त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात योगदान दिलं आहे. अशा या गुणी क्रिकेटपटूच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीय.

कॅप्टन झाल्यानंतर जाडेजा म्हणाला

“कॅप्टन झाल्यामुळे बर वाटतयं. पण माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. माही भाईंनी मोठा वारसा मागे सोडलाय, तो मला पुढे घेऊन जायचा आहे. पण मी अजिबात घाबरत नाही. कारण माही भाई इथेच आहेत. मला काही प्रश्न पडले, तर मी त्यांना जाऊन विचारणार. त्यांचे मार्गदर्शन मला मिळत राहील. तुम्ही जे प्रेम दिलंत, त्याबद्दल तुमचे आभार”

मागच्या तीन सीजनमध्ये कशी आहे जाडेजाची कामगिरी

रवींद्र जाडेजाने 2018 मध्ये 17.80 च्या सरासरीने 89 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर पुढच्या तीन सीजनमध्ये त्याने जबरदस्त प्रदर्शन केलं. 2019 मध्ये जाडेजाने 35 पेक्षा जास्त सरासरीने 106 धावा केल्या. 2020 मध्ये त्याने 46 च्या सरासरीने 232 धावा केल्या. मागच्या सीजनमध्ये जाडेजाने 75 पेक्षा जास्त सरासरीने 227 धावा केल्या. जाडेजा आयपीएलमध्ये 200 सामने खेळला आहे. त्याने 27 पेक्षा जास्त सरासरीने 2386 धावा केल्या आहेत. त्याशिवाय 127 विकेटही घेतल्या आहेत.

सुपरकिंग्सला जाडेजावर विश्वास

जाडेजा कॅप्टन बनल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्सचे CEO काशी विश्वनाथन यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. जाडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्स चांगलं प्रदर्शन करेल, असा विश्वनाथन यांना विश्वास आहे. सीएसकेच्या मते जाडेजा आपल्या करीयरमधील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. धोनीचे मार्गदर्शन त्याला लाभणार आहे. रवींद्र जाडेजाला CSK ची संस्कृतीही चांगल्या प्रकारे माहित आहे.