IPL 2022 auction: अय्यरपासून पटेलपर्यंत आणि धवनपासून डिकॉकपर्यंत, कोट्यवधीचा पुकारा करणारा कोसळला तेव्हा नेमकं काय घडलं?

IPL 2022 auction Hugh Edmeades: ह्यू एडमीड्स यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळत असून रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांना चक्कर आल्याची शक्यता आहे.

IPL 2022 auction: अय्यरपासून पटेलपर्यंत आणि धवनपासून डिकॉकपर्यंत, कोट्यवधीचा पुकारा करणारा कोसळला तेव्हा नेमकं काय घडलं?
Auctioneer Hugh Edmeades
| Updated on: Feb 12, 2022 | 3:17 PM

बंगळुरु: आज IPL च्या पंधराव्या सीजनसाठी लिलाव सुरु असताना ब्रिटिश ऑक्शनर ह्यू एडमीड्स अचानक चक्कर येऊन कोसळले. लिलाव सुरु असताना ही दुर्देवी घटना घडली. श्रीलंकेचा ऑलराऊंडर वानिन्दु हसारंगावर बोलीची प्रक्रिया सुरु असताना ही घटना घडली. लिलावाची जबाबादरी संभाळणारे, बोली पुकारणारे ह्यू एडमीड्स (Hugh Edmeades) यांना अचानक चक्कर आली. बंगळुरुमध्ये (Banglore) हा लिलाव सुरु आहे. तूर्तास लिलाव प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.

दुपारी 3.30 वाजता पुन्हा लिलाव सुरु होईल. ह्यू एडमीड्स यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळत असून रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांना चक्कर आल्याची शक्यता आहे. डॉक्टरांच्या देखरेखील त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

ह्यू एडमीड्स हे मूळचे ब्रिटीश ऑक्शनर आहेत. त्यांच वय 63 आहे. ह्यू एडमीड्स कोसळले, त्या प्रसंगाचा व्हिडिओ आता समोर आला आहे. नेमकं त्यावेळी काय घडलं, ते या व्हिडिओमध्ये पाहा. वानिन्दु हसारंगावर 10.75 कोटीची बोली लागलेली असताना ही घटना घडली.