IPL 2022: आयपीएल खेळण्याआधी 10 षटक टाकून दाखवं, BCCI, NCA कडून हार्दिक पंड्याला चॅलेंज

| Updated on: Mar 15, 2022 | 5:37 PM

IPL 2022: मागच्यावर्षीचा T-20 वर्ल्डकप वगळता हार्दिक कुठल्याही स्पर्धेत खेळलेला नाही. हार्दिकला यंदाची आय़पीएल स्पर्धा खेळण्याआधी फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे.

IPL 2022: आयपीएल खेळण्याआधी 10 षटक टाकून दाखवं, BCCI, NCA कडून हार्दिक पंड्याला  चॅलेंज
Hardik Pandya
Follow us on

IPL 2022: मागच्या काही काळापासून भारताचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी त्याला रणजी स्पर्धेत खेळण्याचा सल्ला दिला होता. पण हार्दिकने निवड समिती सदस्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं. हार्दिक गोलंदाजी करु शकतो का ? हा मुख्य प्रश्न आहे. मागच्यावर्षीचा T-20 वर्ल्डकप वगळता हार्दिक कुठल्याही स्पर्धेत खेळलेला नाही. हार्दिकला यंदाची आय़पीएल स्पर्धा खेळण्याआधी फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजे NCA मध्ये हार्दिकची फिटनेस टेस्ट होईल. हार्दिकने फिटनेस टेस्टसाठी NCA मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिकसाठी ही फिटनेस टेस्ट सोपी नसणार आहे. एनसीएमध्ये फिटनेस सिद्ध करण्यासाठी हार्दिकला दहा षटकं गोलंदाजी करुन दाखवावी लागेल.

हार्दिक पंड्या भारताचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू आहे. गुजरात टायटन्सचा तो कॅप्टन देखील आहे. गुजरात टायटन्स हा आयपीएलमधला नवीन संघ आहे.

यो-यो टेस्ट द्यावीच लागेल

“एनसीएचे फिजियो आणि व्हीव्हीएस लक्ष्मण फिटनेस चाचणीचा कार्यक्रम ठरवतील. फिटनेस टेस्टचे जे निकष आहेत, त्यामध्ये बंधनकारक असलेली यो-यो टेस्ट तसेच दहा षटक गोलंदाजी त्याला करुन दाखवावीच लागेल, निवड समिती सदस्यांनी हे स्पष्ट केलं आहे. हा कार्यक्रम खास हार्दिकसाठी डिझाईन केलेला नाही. सर्वच क्रिकेटपटूंना फिटनेस टेस्ट पास करण्यासाठी यातून जावं लागतं. सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील क्रिकेटपटूंना आयपीएल आधी फिटनेस टेस्ट बंधनकारक आहे” असं वरिष्ठ बीसीसीआय अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्टला सांगितलं.

हार्दिकच्या टेस्टच्यावेळी तिथे कोण हजर असणार?

सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील क्रिकेटपटूंवर NCA च्या मेडीकल स्टाफचं बारीक लक्ष असतं. टीम इंडियातील खेळाडूंना यो-यो टेस्टमध्ये किमान 16.5 स्कोर आवश्यक आहे. यो-यो टेस्टमध्ये हार्दिकचा सरासरी स्कोर 18 आणि त्यापेक्षा जास्त राहिला आहे. एनसीएचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण आणि एनसीए फिजियोच्या देखरेखीखाली हार्दिकची ही टेस्ट होईल. टीम इंडियाचे फिजियो नितीन पटेल सुद्धा या चाचणीच्यावेळी तिथे उपस्थित असतील. मागच्यावर्षी श्रेयस अय्यरला सुद्धा आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात खेळण्याआधी फिटनेस टेस्ट द्यावी लागली होती. यावर्षी ऑक्टोंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणारी टी-20 वर्ल्डकप स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन बीसीसीआय हे सर्व करत आहे.