IPL 2022: युजवेंद्र चहल Rajasthan Royals चा नवीन कॅप्टन? नक्की काय आहे भानगड?

| Updated on: Mar 16, 2022 | 3:20 PM

IPL 2022: आयपीएलच्या (IPL) 15 व्या सीजनसाठी सर्वच संघांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. येत्या 26 मार्चपासून मुख्य स्पर्धेला सुरुवात होत आहे. बहुतांश खेळाडू फ्रेंचायजींनी आयोजित केलेल्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये पोहोचले आहेत.

IPL 2022: युजवेंद्र चहल Rajasthan Royals चा नवीन कॅप्टन? नक्की काय आहे भानगड?
पर्पल कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे.
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

नवी दिल्ली: आयपीएलच्या (IPL) 15 व्या सीजनसाठी सर्वच संघांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. येत्या 26 मार्चपासून मुख्य स्पर्धेला सुरुवात होत आहे. बहुतांश खेळाडू फ्रेंचायजींनी आयोजित केलेल्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये पोहोचले आहेत. श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळणारे खेळाडू क्वारंटाइन झाले आहेत. या खेळाडूंमध्ये युजवेंद्र चहलही (Yuzvendra chahal) आहे. या सीजनमध्ये चहल राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळणार आहे. मागच्या सीजनपर्यंत तो रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळत होता. RCB साठी खेळणारा युजवेंद्र चहल आता राजस्थानला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. राजस्थान रॉयल्सच्या संघात चहलची भूमिका महत्त्वाची असेल. दरम्यान राजस्थान रॉयल्सच्या एका टि्वटने सर्वच चाहते चक्रावून गेले आहेत. या टि्वटमध्ये युजवेंद्र चहलला राजस्थानचा कर्णधार म्हणून नियुक्त केल्याचा मेसेज आहे. जोस बटलर सोबत युजवेंद्र ओपनिंग करणार असल्याचे राजस्थान रॉयल्सने म्हटलं आहे.

चहलने राजस्थान रॉयल्सचं टि्वटर अकाऊंट हॅक केलं

राजस्थानचा संघ उतरलेल्या हॉटेलमध्ये युजवेंद्र दाखल होताच, आगामी सीजनमध्ये चहल नेतृत्व करणार असल्याचं टि्वट करण्यात आलं. संजू सॅमसननेही त्याला शुभेच्छा दिल्या. संजू सॅमसनला राजस्थान संघाने कॅप्टन म्हणून नियुक्त केलं आहे. हा सर्व प्रकार म्हणजे खोडकरपणा असून स्वत: चहलनेच ही मस्ती केली असण्याची शक्यता आहे. त्यानेच राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत टि्वटर अकाऊंटवरुन स्वत:ला कॅप्टन घोषित केलं.

राजस्थानने दिलं उत्तर

एकप्रकारे तो राजस्थान रॉयल्सचं टि्वटर अकाऊंट हॅक करण्यात यशस्वी ठरला. चहलच्या या मस्तीला राजस्थान रॉयल्स संघाने अनिल कूपरच्या ‘नायक’ चित्रपटातील डायलॉग पोस्ट करुन उत्तर दिलं. “तुम्ही जे बोलताय, ते चर्चेसाठी, ऐकण्यासाठी चांगलं वाटतं. पण प्रत्यक्षात हे व्यवहार्य नाही” असा डायलॉग राजस्थान रॉयल्सने पोस्ट केला आहे. युजवेंद्र चहलला मस्ती करण्याची सवय आहे. आरसीबीमध्ये असतानाही त्याचे खोडकरपणाचे व्हिडिओ समोर यायचे. आत राजस्थानच्या संघात गेल्यानंतरही त्याने असाच आपला खोडकरपणा जपलाय.

असा आहे राजस्थानचा संघ

राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2022 साठी एक मजबूत संघ बनवला आहे. चहलला ऑक्शनमध्ये राजस्थान संघाने 6.50 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. चहल ऑक्शनमधला एक महागडा फिरकी गोलंदाज आहे. राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, आर.अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा या खेळाडूंना विकत घेतलं आहे.

संबंधित बातम्या:
IPL 2022: खबरदार! बायो बबल मोडल्यास बंदीपासून ते कोट्यवधीचा दंड, वाचा BCCI चे अद्दल घडवणारे नियम
IPL 2022: एखाद्या टीमकडे 12 खेळाडू नसतील, तर मॅच होईल का? नियम काय सांगतो
IPL 2022: ‘या’ परदेशी खेळाडूंनी आयपीएल संघांना दिला धोका, वेळेवर खेळण्यासाठी उपलब्ध नसणार