AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: खबरदार! बायो बबल मोडल्यास बंदीपासून ते कोट्यवधीचा दंड, वाचा BCCI चे अद्दल घडवणारे नियम

IPL 2022: आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धा येत्या 26 मार्चपासून सुरु होत आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्समध्ये होणार आहे. दोन्ही संघांनी आपला सराव सुरु केला आहे.

IPL 2022: खबरदार! बायो बबल मोडल्यास बंदीपासून ते कोट्यवधीचा दंड, वाचा BCCI चे अद्दल घडवणारे नियम
IPL 2022 बायो बबल मोडल्यास खैर नाही Image Credit source: twitter
| Updated on: Mar 15, 2022 | 9:11 PM
Share

मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धा येत्या 26 मार्चपासून सुरु होत आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्समध्ये होणार आहे. दोन्ही संघांनी आपला सराव सुरु केला आहे. स्पर्धेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. कोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नाही. बीसीसीआयने तेच लक्षात घेऊन अत्यंत कठोर नियमावली तयार केली आहे. बायो बबल संदर्भात (IPL 2022 Bio- Bubble) हे नियम आहेत. BCCI ने कठोर नियम बनवलेत. बायो बबलचे नियम मोडल्यास त्या खेळाडूवर एका सामन्याची बंदी घालण्यात येईल. संघाचे गुण कापण्यात येतील त्याशिवाय एक कोटी रुपयापर्यंत दंड ठोठावण्याची तरतूदही नियमात करण्यात आली आहे. बायो बबलमध्ये खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने मागचा सीजन स्थगित करावा लागला होता.

बायो बबलचे नियम मोडल्यास मोठी कारवाई

त्यानंतर स्पर्धेचं दुसरं सत्र यूएईमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. बीसीसीआयने आयपीएल संदर्भात आता कठोर नियम बनवले आहेत. कुठलाही खेळाडू, कुटुंबातील सदस्य, संघाचे मालक किंवा त्यांच्याशी संबंधित लोकांनी बायो बबलचे उल्लंघन केल्यास त्याची किंमत संघांना चुकवावी लागेल. क्रिकबजने हे वृत्त दिलं आहे. बायो बबलचे उल्लंघन केल्यास खेळाडूवर एका सामन्याच्या बंदीची कारवाई होईल. त्याशिवाय त्याला आणखी सात दिवस क्वारंटाइनमध्ये रहावे लागेल. खेळाडूच्या कुटुंबातील सदस्यांनी किंवा मॅच अधिकाऱ्याने उल्लंघन केल्यास मोठी कारवाई केली जाईल.

टीमला ठोठवणार एक कोटीचा दंड, गुणही कापणार

आयपीएल 2022 दरम्यान जाणूनबुजून कुठल्याही व्यक्तीला टीमने बायो बबलमध्ये आणलं, तर शिक्षा म्हणून एक कोटी रुपयापर्यंत रक्कम भरावी लागेल. अशी चूक पुन्हा झाली, तर टीमचे एक ते दोन पॉईंट कापले जातील.

खेळाडूने बायो बबलचा नियम मोडला तर काय होईल?

पहिल्यांदा बायो बबल मोडल्यास खेळाडूला सात दिवस क्वारंटाइनमध्ये रहावे लागेल. त्याशिवाय तो जितके सामने खेळणार नाही, त्याचे पैसे सुद्धा त्याला मिळणार नाहीत. दुसरी चूक केल्यास खेळाडूला सात दिवसाच्या क्वारंटाइन बरोबर एक मॅचच्या बंदीचाही सामना करावा लागेल. तिसऱ्यांदा बायो बबलचे उल्लंघन केल्यास संपूर्ण मोसमासाठी बाहेर केलं जाईल व संघाला कुठली रिप्लेसमेंटही मिळणार नाही.

खेळाडूच्या कुटुंबाने बायो बबल तोडलं तर?

पहिली चूक केल्यास खेळाडूच्या कुटुंबातील सदस्याला सात दिवस क्वारंटाइनमध्ये रहावे लागेल. दुसरी चूक केल्यास खेळाडूचं कुटुंब, मित्रांना बायोबबल मधून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल तसेच त्याच्याशी संबंधित खेळाडूला सात दिवस क्वारंटाइन मध्ये राहवं लागेल.

कुठल्या बाहेरच्या व्यक्तीला बायो बबलमध्ये प्रवेश दिला तर?

पहिली चूक केल्यास त्या संघाला दंड म्हणून एक कोटी रुपये भरावे लागतील. दुसरी चूक केल्यास एक गुण कापला जाईल आणि तिसरी चूक केल्यास दोन गुण कापले जातील.

संबंधित बातम्या: IPL 2022: नरिमन पॉईंट ते अंधेरी, मुंबईच्या कुठल्या हॉटेलमध्ये IPLची कुठली टीम उतरणार, काय सुविधा मिळणार? IPL 2022: आयपीएल खेळण्याआधी 10 षटक टाकून दाखवं, BCCI, NCA कडून हार्दिक पंड्याला चॅलेंज IPL 2022: ‘या’ परदेशी खेळाडूंनी आयपीएल संघांना दिला धोका, वेळेवर खेळण्यासाठी उपलब्ध नसणार

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.