IPL 2022: एखाद्या टीमकडे 12 खेळाडू नसतील, तर मॅच होईल का? नियम काय सांगतो

IPL 2022: एखाद्या टीमकडे 12 खेळाडू नसतील, तर मॅच होईल का? नियम काय सांगतो

आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेची सुरुवात 26 मार्चपासून होत आहे. यंदा मुंबई आणि पुण्यातील स्टेडियम्समध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. मुंबईतील (Mumbai) तीन स्टेडियम्समध्ये लीग स्टेजचे सामने होतील.

दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Mar 15, 2022 | 9:26 PM

आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेची सुरुवात 26 मार्चपासून होत आहे. यंदा मुंबई आणि पुण्यातील स्टेडियम्समध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. मुंबईतील (Mumbai) तीन स्टेडियम्समध्ये लीग स्टेजचे सामने होतील. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियममध्येही सामने आयोजित केले जातील. मुंबईच्या वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील स्टेडियममध्ये हे सामने होणार आहेत. कोविडमुळे फक्त मर्यादीत स्टेडियम्समध्ये सामने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे बीसीसीआय (BCCI) कुठलाही धोका पत्करायला तयार नाही. त्यामुळेच अनेक नियम बनवण्यात आले आहेत. कोविडमुळे एखाद्यावेळी मैदानावर उतरवण्याइतपत खेळाडूच संघाकडे नसण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीबद्दलही बीसीसीआयने विचार करुन नियम बनवला आहे. बीसीसीआयने बायो बबलसाठी सुद्धा कठोर नियम बनवलेत.
मागच्यावर्षी बीसीसीआयने आधी भारतातच आयपीएलचं आयोजन केलं होतं. पण कोरोनाने बायो बबलमध्येही घुसखोरी केल्याने स्पर्धा मध्येच थांबवावी लागली होती. त्यानंतर यूएईमध्ये उर्वरित सामन्यांचे आयोजन करण्यात आले.

एखाद्या संघाकडे 12 खेळाडू नसतील मग काय होणार?

कुठल्याही फ्रेंचायजीकडे सामन्यासाठी 12 पेक्षा कमी खेळाडू उपलब्ध असतील. म्हणजे प्लेइंग इलेवनचे 11 आणि एक सब्सिटीयूट खेळाडू. कोरोनामुळे ते आपला संघ मैदानावर उतरवू शकले नाहीत, तर त्याला नियमांचे उल्लंघन मानले जाईल. अशा परिस्थितीत बीसीसीआय पुन्हा सामन्याचे आयोजन करण्याचा प्रयत्न करेल. हे शक्य झालं नाही, तर आयपीएलच्या टेक्निकल समितीकडे तो विषय पाठवला जाईल. टेक्निकल समितीचा निर्णय अंतिम असेल, तो निर्णय संघाला मान्य करावाचा लागेल. क्रिकबजने आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.

स्पर्धेचे नवीन स्वरुप कसे आहे?

यंदा आयपीएलमध्ये आठ नाही दहा संघ उतरणार आहेत. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ आहेत. 10 टीम्सची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स एका ग्रुपमध्ये आहेत. ग्रुप बी मध्ये चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आहेत. प्रत्येक टीम आपल्या ग्रुपमधील संघासोबत प्रत्येकी दोन-दोन सामने खेळेल. दुसऱ्या ग्रुपमधील टीम सोबत प्रत्येकी एक सामना होईल.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें