IPL 2022: ‘नाम के हकदार पेहेले आप’, आयपीएलमध्ये लखनऊ संघाच्या बाबतीत पहिल्यांदाच असं घडणार

| Updated on: Jan 05, 2022 | 3:27 PM

लखनऊ फ्रेंचायझीने (Lucknow franchise) कोचिंगसाठी दोन मोठ्या नावांना करारबद्ध केले आहे. यात भारताचे माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवर या नावांचा समावेश आहे.

IPL 2022: नाम के हकदार पेहेले आप, आयपीएलमध्ये लखनऊ संघाच्या बाबतीत पहिल्यांदाच असं घडणार
ipl
Follow us on

लखनऊ: इंडियन प्रिमीयर लीगच्या यंदाच्या हंगामात (IPL 2022) दोन नवीन संघ असणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबाद. या दोन संघांपैकी लखनऊने टि्वटरवर पदार्पण केलं असून त्यांनी चाहत्यांनाच संघासाठी नवीन नाव सुचवण्याची विनंती केली आहे. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन संघांनी अद्याप आपली नावे जाहीर केलेली नाहीत. लखनऊ फ्रेंचायझीने (Lucknow franchise) कोचिंगसाठी दोन मोठ्या नावांना करारबद्ध केले आहे. यात भारताचे माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवर या नावांचा समावेश आहे. (IPL 2022 Lucknow IPL Team Debuts on Twitter Asks Fans to Suggest Name for the Franchise)

हिंदुस्थान स्वागत करो लखनऊ का

गौतम गंभीर संघासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावणार आहे. पहिल्यांदाच फॅन्स संघाचं नाव ठेवणार, असं टि्वट लखनऊ फ्रेंचायजीने केलं आहे. आयपीएलमधील लखनऊ संघाचं टि्वटरवर जोरदार स्वागत झालं आहे. क्रिकेटकडून राजकारणाकडे वळलेल्या गंभीरने “हिंदुस्थान स्वागत करो लखनऊ का” असे टि्वट केले आहे.

कोलकाता स्थित ग्रुपने लखनऊ संघाचे हक्क विकत घेतले आहेत. संजीव गोएंका या संघाचे मालक आहेत. लखनऊ टीम विकत घेण्यासाठी 7,090 कोटी रुपये मोजले आहेत. 2016 आणि 2017 मध्ये याच फ्रेंचायजीने रायजिंग पुणे सुपरजायंट टीम विकत घेतली होती.

संबंधित बातम्या:

New Home Isolation Guidelines : Omicronच्या पार्श्वभूमीवर होम आयसोलेशनसाठी नवी नियमावली, काय म्हटलं आरोग्य मंत्रालयानं?
Coronavirus: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव, आई-पत्नीसह चौघांना लागण
Sanjay Raut| गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग व्हावा ही राहुल-प्रियांका यांची इच्छा, पण…; संजय राऊतांचं मोठं विधान