Coronavirus: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव, आई-पत्नीसह चौघांना लागण

Coronavirus: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव, आई-पत्नीसह चौघांना लागण
Sanjay Raut

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. राऊत यांची आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीला कोरोनाची लागण झाली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jan 05, 2022 | 2:29 PM

मुंबई: शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. राऊत यांची आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीला कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरातील सदस्यांना कोरोनाची लक्षणे जाणवल्यानंतर त्यांची टेस्ट करण्यात आली होती. या टेस्टचा रिपोर्ट आला असून राऊत यांच्या आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. मात्र, या सर्वांची लक्षणे सौम्य असून त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे.

नेते आणि सेलिब्रिटीही कोरोनाच्या विळख्यात

राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील 50 आमदार आणि 10 ते 15 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, खासदार सुजय विखे पाटील, शिवसेना नेते अरविंद सावंत, मदन येरावार, वरुण सरदेसाई, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी आदींना कोरोनाची लागण झाली आहे. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. या शिवाय गायक सोनू निगमलाही कोरोनाची लागण झाली आहे. तर सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बंगल्यातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.

राज्यातील रुग्णसंख्या काय?

राज्यात काल 18 हजार 466 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 हजार 558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आज 20 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 66 हजार 308 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासूनची आकडेवारी पाहिली तर राज्यात आतापर्यंत 67 लाख 30 हजार 494 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 65 लाख 18 हजार 916 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 1 लाख 41 हजार 573 झाली आहे.

ओमिक्रॉनचे रुग्ण वाढताहेत

राज्यात ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेले रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. राज्यात आज 75 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 40 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. आजच्या 75 रुग्णांसह राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या आता 653 वर पोहोचली आहे.

मुंबईला सर्वाधिक विळखा

मुंबईत तब्बल 10 हजार पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून आले आहे. तर 654 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 92 टक्के असून सध्याच्या घडीला वाढलेल्या सक्रिय रुग्णसंख्येनं चिंतेत भर पडली आहे. 47 हजार 476 सक्रिय रुग्ण एकट्या मुंबईत असल्याचं आजच्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO: मुख्यमंत्री खुर्चीवर नसताना राज्य व्यवस्थित सुरू, कारण राज्यपाल सक्रिय; रावसाहेब दानवेंचा टोला

वाऱ्याच्या वेगाने फिरतोय व्हिडिओ, दानवे-सत्तार भेटीचा राजकीय अर्थ काय? अर्जुन खोतकर यांचा गेम होणार?

Weather Forecast : विदर्भ उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता, IMD कडून यलो ॲलर्ट जारी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें