वाऱ्याच्या वेगाने फिरतोय व्हिडिओ, दानवे-सत्तार भेटीचा राजकीय अर्थ काय? अर्जुन खोतकर यांचा गेम होणार?

वाऱ्याच्या वेगाने फिरतोय व्हिडिओ, दानवे-सत्तार भेटीचा राजकीय अर्थ काय? अर्जुन खोतकर यांचा गेम होणार?
रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांची नवी दिल्ली येथील भेट

जालन्यात अर्जुन खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार अशी बॅनरबाजी सुरु असतानाच तिकडे दिल्लीत दानवे आणि अब्दुल सत्तारांची भेट झाली . या भेटीतून लोकसभा निवडणुकीच्या तयारी तर सुरु केली नाही ना.. अशी चर्चा रंगलीय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jan 05, 2022 | 1:06 PM

औरंगाबादः केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची आणि राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar)  यांची आज सकाळी दिल्लीत भेट झाली. भाजप आणि शिवसेनेच्या मराठवाड्यातील या दिग्गज नेत्यांची दिल्लीत नेमकी काय चर्चा झाली, हे महत्त्वाचे आहेच. कारण या भेटीचा व्हिडिओ दिल्लीतून वाऱ्यापेक्षाही जास्त वेगाने जालन्यात येऊन धडकला. फक्त सहा सेकंदाच्या या व्हिडिओने जालन्यात चर्चांना उधाण आलंय. जालना लोकसभा मतदार संघासाठी 2024 ची दानवेंची तयारी आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दिल्लीत झालेल्या भेटीत नेमकं काय घडलं, याचे निरनिराळे तर्क वितर्क लावले जात आहेत.

अर्जुन खोतकरांचा गेम?

जालन्यात माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील युद्ध सर्वपरिचित आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळीही या दोघांमधील वाद चव्हाट्यावर आले होते. त्यावेळी खोतकरांनी माघार घेतली होती. आता पुढील 2024 मधील लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच अर्जुन खोतकर यांच्याविरोधात झालेल्या ED च्या कारवाईसाठी दानवेच जबाबदार आहेत, असा जाहीर आरोप खोतकर करत आहेत. राज्यात भाजप-शिवसेना विरोधात असली तरीही गेल्या काही दिवसात दिल्लीत होणाऱ्या भेटी-गाठी तसेच महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षांच्या पुढे फार टिकणार नाही, अशा चर्चांना उधाण आलं आहेत. काल अब्दुल सत्तार यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली तर आज रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. या भेटीत नेमकं काय घडलं, ही माहिती पुढे येईलच. मात्र तोपर्यंत यामागे लोकसभा निवडणुकीची तयारी तर नाही ना? दानवेंनी दिल्लीत जाऊन अर्जुन खोतकरांचा गेम तर केला नाही ना? अशा चर्चांना उधाण आलंय..

जालन्यात खोतकरांची बॅनरबाजी सुरु असतानाच अशा चर्चा

खोतकर यांचा दोन दिवसांपूर्वीच वाढदिवस झाला. तेव्हा संपूर्ण जालन्यात भावी खासदार म्हणून खोतकर यांच्या नावाने पोस्टर झळकले होते. त्यामुळे आगामी निवडणूक खोतकर विरुद्ध दानवे अशी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी दानवेंची भेट घेतली. सत्तार आणि दानवे यांची भेट नेमक्या टायमिंगलाच झाल्याने खोतकर यांचा राजकीय गेम तर होणार नाही ना? अशा चर्चांनाही उधाण आलं आहे.

सत्तार-दानवे यांची दिल्लीत भेट

अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांची मैत्री जूनीच आहे. पण काल शिवसेना भाजप युतीबाबत अब्दुल सत्तार यांनी मोठं विधान केलं. या दोन पक्षांमधील युतीचा पूल नितीन गडकरीच बांधू शकतात, असं ते म्हणाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 5 जानेवारी रोजी अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा भूकंप येतो की काय अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

इतर बातम्या-

‘जलसा’वर कोरोनाचं सावट, अमिताभ बच्चन यांच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण!

Nagpur | गोदामात होती सुगंधी तंबाखू, गुन्हे शाखेने टाकली धाड; पुढील कारवाई अन्न प्रशासन विभाग करणार?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें