IPL 2022: मृत्यूच्या काही तास आधी वॉर्नच्या डोक्यात IPL होतं, मित्राने सांगितला नेमका काय संवाद झाला?

| Updated on: Mar 07, 2022 | 2:05 PM

जागतिक क्रिकेटमधील एका महान लेग स्पिनरला जग मुकलं आहे. मागच्या आठवड्यात शेन वॉर्नचं (Shane warne) दुर्देवी निधन झालं. वयाच्या 52 व्या शेन वॉर्नने थायलंडमधल्या एक व्हिलात (Thailand villa) अखेरचा श्वास घेतला.

IPL 2022: मृत्यूच्या काही तास आधी वॉर्नच्या डोक्यात IPL होतं, मित्राने सांगितला नेमका काय संवाद झाला?
शेन वॉर्नची चर्चेतली प्रकरणं
Image Credit source: circle of cricket
Follow us on

सिडनी: जागतिक क्रिकेटमधील एका महान लेग स्पिनरला जग मुकलं आहे. मागच्या आठवड्यात शेन वॉर्नचं (Shane warne) दुर्देवी निधन झालं. वयाच्या 52 व्या शेन वॉर्नने थायलंडमधल्या एक व्हिलात (Thailand villa) अखेरचा श्वास घेतला. तिथे तो मित्रांसमवेत सुटट्या एन्जॉय करण्यासाठी गेला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही शेन वॉर्नने क्रिकेट बरोबरची आपली नाळ तोडली नाही. अगदी मृत्यूच्या काही तास आधीपर्यंत त्यांच्या डोक्यात क्रिकेटचाच विचार होता. अखेरच्याक्षणी शेन वॉर्नसोबत असलेल्या मित्रानेच त्यांच्यामध्ये काय संवाद झाला तो उलगडून सांगितला आहे. शेन वॉर्नला भारतीय क्रिकेटबद्दल एक वेगळी आस्था होती. ती नेहमीच त्याच्या बोलण्यातून दिसायची. अगदी अखरेच्या क्षणी सुद्धा शेन वॉर्न भारतीय क्रिकेटबद्दलच बोलत होता. शेन वॉर्न सोबत असलेल्या मित्राने हा संवाद उलगडला आहे. निश्चितच यामुळे आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचे चाहते भावूक होतील. मृत्यूच्या काहीतास आधी शेन वॉर्न आयपीएल (IPL) आणि राजस्थान रॉयल्सबद्दल भरभरुन बोलत होता.

आम्ही सर्व डिनरला जमलो होतो, त्यावेळी….

“आम्ही सर्व डिनरला जमलो होतो. वॉर्नने सर्वांसाठी भेटवस्तू आणल्या होत्या. त्यावेळी डिनरच्या टेबलवर शेन वॉर्न सर्व मित्रांना आयपीएलमधील विजयाच्या आठवणी सांगत होता. आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सला कसं विजेतेपद मिळवून दिलं? अनेक नवखे खेळाडू त्या संघात होते, त्याबद्दल वॉर्न भरभरुन बोलला” वॉर्न सोबत असलेला त्याचा मित्र टॉम हॉलने ही माहिती दिली.

पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव झाला. पण त्यानंतर शेन वॉर्नने संघाचे मालक मनोज बादाले यांना आश्वस्त केलं. राजस्थानने त्या सीजनमध्ये उर्वरित सामन्यांसह स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. ती आठवण वॉर्नने मित्रांसोबत शेअर केली. मृत्यूच्या काहीतास आधी आयपीएलच वॉर्नच्या डोक्यात होतं, असे टॉम हॉल यांनी द स्पोर्टिंग न्यूज वेबसाइटसाठी लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे.

रुममध्ये आढळले रक्ताचे डाग

ऑस्ट्रेलियात असतानाच शेन वॉर्नच्या छातीत वेदना होतं होत्या. शेन वॉर्नच्या खोलीत रक्ताचे डाग सुद्धा आढळले आहेत. हे रक्त शेन वॉर्नचच आहे. कारण सीपीआर ट्रीटमेंट देत असतानाच त्याच्या तोंडातून हे रक्त पडलं होतं. शेन वॉर्नच्या मृत्यू संशयास्पद नसल्याचं थायलंड पोलिसांचं मत आहे.

शेन वॉर्न त्याच्या तीन मित्रांसोबत तीन महिने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी थायलंडच्या कोह समुई बेटावर गेला होता. तिथेच त्याने अखेरचा श्वास घेतला. वॉर्नचा मित्र त्याला जेवण्यासाठी म्हणून बोलवायला गेला, त्यावेळी तो मृतावस्थेत आढळला. त्याच्या मित्रांनीच लगेच त्याला सीपीआर ट्रीटमेंट दिली. पण वॉर्नला वाचवता आलं नाही. प्रॉविंशियल पोलिसांचे कमांडर सतित पॉल्पिनित यांनी वॉर्नच्या खोलीत रक्ताचे डाग आढळल्याचं सांगितलं.