
मुंबई: महेंद्र सिंह धोनीने चेन्नई सुपरकिंग्सचं कर्णधारपद सोडलं (MS Dhoni Quits CSK Captaincy) आहे. गुरुवारी धोनीने कॅप्टनशिप सोडण्याचा मोठा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व आता रवींद्र जाडेजाकडे (Ravindra Jadeja) सोपवलं आहे. जाडेजा मागच्या दहा वर्षांपासून चेन्नईच्या संघातून खेळतोय. स्वत: धोनीने कॅप्टनशिपची जबाबदारी जाडेजाकडे सोपवली आहे. धोनीने कर्णधारपद सोडण्याच्या आणि जाडेजाच्या नियुक्ती दरम्यान सुरेश रैना (Suresh Raina) मोठ्या प्रमाणात ट्रोल होतोय. शेवटी असं काय घडलं की, सुरेश रैनाला चाहत्यांनी इतकं सुनावलं. सुरेश रैनाने रवींद्र जाडेजाला चेन्नई सुपरकिंग्सचा कॅप्टन झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. पण त्याने टि्वटमध्ये धोनीबद्दल एक शब्दही लिहिला नाही.
सुरेश रैनाने टि्वटमध्ये काय लिहिलं आहे?
“माझ्या भावासाठी मी खूप उत्साहित आहे. आम्ही दोघे ज्या फ्रेंचायजीत मोठे झालो, त्याचं नेतृत्व संभाळण्यासाठी यापेक्षा दुसरी योग्य व्यक्ती असू शकत नाही. ऑल द बेस्ट जाडेजा. हा खूप उत्साहित करणारा फेज आहे. तू सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करशील याचा मला विश्वास आहे. भरपूर सारं प्रेम” असं टि्वट रैनाने केलं आहे. रैनाने त्याच्या टि्वटमध्ये धोनीबद्दल एक शब्दही लिहिलेला नाही. त्यामुळे धोनीच्या फॅन्सनी त्याला ट्रोल केलं.
रैनाने धोनीला शुभेच्छा का नाही दिल्या?
एखादा खेळाडू कॅप्टनशिप सोडतो, तेव्हा सोबत खेळलेले खेळाडू एकत्र घालवलेले क्षण आठवतात. धोनीच्या नेतृत्वाखाली रैनाने आयपीएल आणि टीम इंडियात अनेक सामने खेळलेत. या दोघांनी मिळून चेन्नई सुपर किंग्सला एका उंचीवर नेऊन ठेवलं. पण धोनीबद्दल रैनाने एक शब्दही लिहिला नाही. रैनाच्या या टि्वटला आयपीएल ऑक्शनशी जो़डलं जात आहे. आयपीएल 2022 मेगा ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्सने आपल्या संघातून खेळलेल्या अनेक खेळाडूंवर बोली लावली. पण सुरेश रैनावर बोली लावली नाही. रैनाला चेन्नईच नाही अन्य दुसऱ्या कुठल्याही संघाने विकत घेतलं नाही. तोच राग रैनाने मनात ठेवल्याचा धोनीच्या चाहत्यांचा आरोप आहे.
Absolutely thrilled for my brother. I can’t think of anyone better to take over the reins of a franchise we both had grown up in. All the best @imjadeja . It’s an exciting phase and I’m sure you will live up to all the expectations and love #yellow #csk #WhistlePodu
— Suresh Raina?? (@ImRaina) March 24, 2022
चेन्नईने रैनाला म्हणून विकत घेतलं नाही
चेन्नईने सुरेश रैनाला विकत न घेण्याचमागचं कारणही सांगितलं. रैना त्यांच्या योजनेमध्ये फिट बसत नव्हता. मागच्या सीजनमध्ये रैनाने 12 सामन्यात 17.77 च्या सरासरीने फक्त 160 धावा केल्या होत्या. यामुळेच चेन्नईने त्याला विकत घेतलं नाही.