IPL 2022: मेगा ऑक्शनच्या यादीत एका राज्याच्या क्रीडामंत्र्यांचाही समावेश, फ्रेंचायजीने विकत घेतलं तर खेळताना दिसणार

शेवटचं 2018 आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला होता. त्यावेळी सुद्धा कोणी विकत घेतलं नव्हतं.

| Edited By: | Updated on: Feb 01, 2022 | 6:43 PM
1 / 4
बीसीसीआयने यावर्षी होणाऱ्या आयपीएल ऑक्शनसाठी 590 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यावेळी ऑक्शन लिस्टमध्ये शिखर धवन, आर.अश्विनसारखे मोठे खेळाडू आहेत. यामध्ये पश्चिम बंगलाच्या क्रीडा मंत्र्याचही ऑक्शन लिस्टमध्ये नाव आहे.

2 / 4
भारतासाठी खेळणारे मनोज तिवारी यांनीही मेगा ऑक्शनसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यांची निवड झाली आहे. तिवारी यांची बेस प्राइस 50 लाख आहे. मनोज तिवारी शेवटचं 2018 आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला होता. त्यावेळी सुद्धा मनोज तिवारीला कोणी विकत घेतलं नव्हतं.

3 / 4
यावर्षी रणजी करंडक स्पर्धेसाठी बंगालने संघाची घोषणा केली आहे. त्यामध्ये मनोज तिवारीचं नाव आहे. मनोज तिवारी वर्ष 2020 मध्ये रणजी करंडक स्पर्धेत सौराष्ट्र विरोधात पश्चिम बंगालकडून शेवटचा फर्स्टक्लास सामना खेळले होते.

4 / 4
मनोज तिवारी आता पश्चिम बंगालचा क्रीडा मंत्री आहे. मागच्यावर्षी शिबपुर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. ही निवडणूक ते जिंकले होते. त्यांना ममता बॅनर्जी यांनी युवा आणि क्रीडा खात्याचं मंत्री बनवलं आहे.