ऋषभ पंत IPL 2023 मध्ये परतणार, कोचच्या प्रतिक्रियामुळे एकच खळबळ

| Updated on: Jan 20, 2023 | 6:52 PM

टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत याचा 20 डिसेंबरला अपघात झाला. पंतवर सध्या मुंबईतील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

ऋषभ पंत IPL 2023 मध्ये परतणार, कोचच्या प्रतिक्रियामुळे एकच खळबळ
Follow us on

मुंबई : आयपीएलच्या 16 व्या मोसमाला अजून बरेच दिवस बाकी आहेत. तर दुसऱ्या बाजूला रस्ते अपघातात जबर मार लागलेला ऋषभ पंत याचं आयपीएलमध्ये कमबॅक होणार असल्याचं समोर आलं आहे. रिकी पॉंटिंगने दिलेल्या या माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे. रिकी पॉंटिंग आयपीएलमधील दिल्ली टीमचा कोच आहे. पंत शारिरीकरित्या फीट नसला तरी त्याला सोबत ठेवायला मला आनंद होईल, असं पॉंटिंग म्हणाला.

पंतचा 30 डिसेंबरला रस्ते अपघात झाला. या अपघातात पंतला फार मार लागला. पंत वेळीच गाडीतून बाहेर पडल्याने तो थोडक्यात बचावला, कारण त्यानंतर गाडीने पेट घेतला. पंत आपल्या घरी चालला होता. मात्र या दरम्यान हा अपघात झाला. त्यानंतर पंतवर स्थानिक खासगी रुग्णायात उपचार करण्यात आलं. त्यानंतर पुढील उपचारांसाठी बीसीसीआयने पंतला मुंबईत एअरलिफ्ट करुन आणलं. पंतला कोकिलाबेन अंबानी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. पंतवर लिगामेंट शस्त्रक्रिया करण्या आली. पंतची तब्येत दिवसेंदिवस सुधारतेय. काही दिवसांपूर्वी पंत स्वत:च्या पायावर उभा राहिला होता.

पंतला आता यातून सावरण्यासाठी आणखी काही दिवस विश्रांतची गरज आहे. पंतवर सध्या हॉस्पीटलमध्ये स्पोर्ट्स मेडिसिनचे प्रमुख डॉ दिनशॉ पारदीवाला यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.

हे सुद्धा वाचा

पॉंटिंग काय म्हणाला?

“आम्ही त्या खेळाडूंच्या जागी दुसऱ्या कुणाला घेऊ शकत नाहीत, हे स्पष्ट आहे. असे खेळाडू असेच तयार होत नाहीत. आम्हाला पाहायला लागेल की टीममध्ये विकेटकीपर-बॅट्समन म्हणून पर्याय आहे का, हे पाहायला लागेल”, असं पॉंटिंगने स्पष्ट केलं.

“पंतने प्रत्येक सामन्यात माझ्यासोबत डगआऊटमध्ये बसावं, अशी माझी इच्छा आहे. पंतला शारिरीकदृष्टया खेळणं शक्य नसेल तरीही त्याला सोबत ठेवायला आवडेल. पंत टीमचा प्रमुख कार्यकर्ता आहे. कर्णधार या नात्याने पंतची भूमिका, हास्य हे असं सर्व आम्हाला आवडतं.”, असं पॉंटिगने स्पष्ट केलं.

“पंतला प्रत्यक्षात प्रवास करायला आणि टीमसोबत राहणं शक्य असेल, तर त्याने किमान आठवड्यातील प्रत्येक दिवशी डगआऊटमध्ये माझ्यासोबत रहावं, अशी माझी इच्छा आहे.”, असं पॉंटिग आयसीसीच्या रिव्यू शोमध्ये म्हणाला.