AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : टीम इंडियानंतर आयपीएलमधूनही ‘या’ दिग्गजाचा पत्ता कट, मॅनेजमेंटला त्याच्यावर नाही विश्वास

Team India: टीम इंडियातून बाहेर असलेल्या या खेळाडूला आयपीएलच्या पहिल्या मॅचमध्ये संधी मिळाली नाही. बीसीसीआयने या खेळाडूला वार्षिक कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून बाहेर ठेवलय.

IPL 2023 :  टीम इंडियानंतर आयपीएलमधूनही 'या' दिग्गजाचा पत्ता कट, मॅनेजमेंटला त्याच्यावर नाही विश्वास
Team india
| Updated on: Apr 01, 2023 | 3:23 PM
Share

Indian Cricket Team : इंडियन प्रीमियर लीगमध्ये शानदार प्रदर्शन करुन अनेक खेळाडूंनी टीम इंडियात स्थान मिळवलय. मागच्यावर्षी दिनेश कार्तिकने या लीगमध्ये छाप सोडली होती. त्यामुळे त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडे झाले. टीम इंडियात पुनरागमनाच्या इराद्याने असाच एक खेळाडू आयपीएलमध्ये उतरलाय. या खेळाडूला आयपीएल 2023 च्या पहिल्या मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मागच्या वर्षभरापासून टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी हा खेळाडू संघर्ष करतोय.

टीम इंडियानंतर आयपीएलमधूनही पत्ता कट

टीम इंडियाकडून खेळलेला दिग्गज क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा भाग आहे. पण सीजनच्या पहिल्या मॅचमध्ये प्लेइंग 11 मध्ये त्याला स्थान मिळालं नाही. अजिंक्य रहाणे मागच्या बऱ्याच काळापासून टीम इंडियाचा भाग नाहीय. आता त्याला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. चेन्नई सुपर किंग्सच टीम कॉम्बिनेशन पाहिल्यास आागमी मॅचेसमध्ये त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

टीम इंडियाकडून खेळताना किती धावा केल्यात?

अजिंक्य रहाणेने टीम इंडियाकडून खेळताना 82 टेस्ट मॅचेसमध्ये 4931 धावा केल्या आहेत. यात 12 सेंच्युरी आहेत. 90 वनडे सामन्यात 2962 धावा केल्या आहेत. 20 टी 20 सामन्यात त्याने 375 धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणेने काही टूरवर टीम इंडियाच नेतृत्व सुद्धा केलय. टीम इंडियाने 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीज 2-1 ने जिंकली. त्यावेळी अजिंक्य रहाणे टीमचा कॅप्टन होता. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एक शतकही झळकवल होतं. शेवटचा सामना कधी खेळला?

अजिंक्य रहाणे टीम इंडियाकडून शेवटचा सामना मागच्यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला पुन्हा टीम इंडियाकडून संधी मिळाली नाही. भारतीय क्रिकेट बोर्डाने 2022-23 साठी वार्षिक कॉन्ट्रॅक्टची यादी जाहीर केली. या लिस्टमध्ये अजिंक्य रहाणेच नाव नाहीय. त्यामुळे करियरच्या दृष्टीने अजिंक्य रहाणेसाठी हा सीजन महत्वाचा आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?