AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : Mumbai Indians ला धक्का बसणार? बुमराहनंतर आणखी एक प्रमुख गोलंदाज OUT होण्याची भिती

IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात एक नवीन गोलंदाज दाखल झालाय. त्यामुळे प्रमुख गोलंदाज सीजनमधून बाहेर गेल्याची भिती व्यक्त केली जातेय. ऑक्शनमध्ये या गोलंदाजाला कोणीही विकत घेतलं नव्हतं.

IPL 2023 : Mumbai Indians ला धक्का बसणार? बुमराहनंतर आणखी एक प्रमुख गोलंदाज OUT होण्याची भिती
IPL 2023 Mumbai IndiansImage Credit source: IPL
| Updated on: Apr 30, 2023 | 4:27 PM
Share

मुंबई : मुंबई इंडियन्सचा आयपीएल 2023 मध्ये आपला प्रवास कायम ठेवण्यासाठी संघर्ष सुरु आहे. याच दरम्यान टीममध्ये बरच काही घडतय. आता मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये इंग्लिश वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनची एंट्री झाल्याच वृत्त आहे. ख्रिस जॉर्डन ऑक्शनमध्ये अनसोल्ड होता. त्याची बेस प्राइस 2 कोटी रुपये होती. पण कुठल्याही फ्रेंचायजीने त्याला विकत घेण्यात रस दाखवला नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार ख्रिस जॉर्डन रिप्लेसमेंट प्लेयर म्हणून मुंबई इंडियन्सशी जोडला गेलाय. ख्रिस जॉर्डन कोणाच्या जागी टीममध्ये आलाय? त्या बद्दल अजून खुलासा झालेला नाही. आता इंग्लंडचा धोकादायक गोलंदाज जोफ्रा आर्चर आयपीएलमधून बाहेर जाणार का? असा प्रश्न विचारला जातोय.

जॉर्डनच्या नावावर किती विकेट?

जॉर्डनकडे आयपीएलचा एक चांगला अनुभव आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, सनरायजर्स हैदराबाद, पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स या टीमकडून तो खेळलाय. 34 वर्षाच्या या गोलंदाजाने 28 इनिंगमध्ये 30.85 च्या सरासरीने 27 विकेट घेतल्यात. तो मागचा आयपीएल सीजन 2022 मध्ये चेन्नई विरुद्ध खेळला होता.

चालू सीजनमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये चांगले वेगवान गोलंदाज नाहीयत. जसप्रीत बुमराह सीजन सुरु होण्याआधीच बाहेर गेला. झाय रिचर्ड्सन सुद्धा दुखापतीमुळे बाहेर आहे. बेल्जियमला जाऊन आला आर्चर

जोफ्रा आर्चर बेल्जियमला जाऊन परत आलाय. आर्चर एल्बो स्पेशलिस्टकडे उपचारासाठी गेला होता. आर्चर बऱ्याच काळापासून दुखापतीचा सामना करतोय. त्यामुळेच तो मागचा सीजन खेळू शकला नव्हता. या सीजनमध्ये पुनरागमन करुन तो फक्त 2 मॅच खेळलाय. त्याला फक्त एक विकेट काढतचा आलाय. रिचर्डसनच्या जागी राइली मेरेडिथ आहे. जॉर्डन कोणाच्या जागा आलाय? त्या बद्दल अजून स्पष्टता नाहीय.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.