IPL 2023 Final फिक्स? ही टीम ठरणार चॅम्पियन, त्या फोटोमुळे एकच खळबळ

| Updated on: May 28, 2023 | 11:27 PM

आयपीएल 16 व्या सत्रातील अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात ट्रॉफीसाठी लढत आहे. मात्र पावसामुळे अंतिम सामन्याचा खेळखंडोबा झाला.

IPL 2023 Final फिक्स? ही टीम ठरणार चॅम्पियन, त्या फोटोमुळे एकच खळबळ
Follow us on

अहमदाबाद | आयपीएल 16 व्या मोसमातील अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. हा सामना 28 मे रोजी आयोजित करण्यात आला. मात्र पावसामुळे या महाअंतिम सामन्याला रात्री 10 वाजून 45 मिनिटांपर्यंत सुरुवात झालेली नाही. त्यामुळे हा सामना आता 29 मे रोजी या राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणं अपेक्षित होतं. तर 7 वाजता टॉस व्हायचा होता.

पाऊस आता थांबेल, आता थांबेल अशी प्रतिक्षा क्रिकेट चाहते करत होते. मात्र रात्री 11 वाजेपर्यंत प्रतिक्षा केल्यानंतर आजचा (28 मे) अंतिम सामन्याचा थरार रंगण्याआधीच बेरंग झाला. त्यामुळे आता सोमवारी 29 मे रोजी राखीव दिवशी महामुकाबला पार पडेल. मात्र त्याआधी एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. या व्हायरल फोटोमुळे आता आयपीएल फायनल फिक्स असल्याचा दावा क्रिकेट चाहत्यांकडून करण्यात येत आहे.

मॅच फिक्स असल्याचा नेटकऱ्यांचा दावा

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एका बिग स्क्रीनवर ‘रनरअप चेन्नई सुपर किंग्स’ असं लिहिलेलं होतं. सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. या फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी चांगलीच फिरकी घेतलीय. “आयपीएल फायनल फिक्स आहे?” असं एका युजर्सने म्हटलंय. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलंय की “फायनल फिक्स आहे कारण सीएसके उपविजेता टीम आहे.” या व्हायरल झालेल्या फोटोमुळे एकच चर्चा रंगली आहे.

गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.

चेन्नई सुपर किंग्स टीम | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.