IPL 2023 | ऋषभ पंत यांची एन्ट्री? कॅप्टन डेव्हिड वॉर्नरकडून मोठी अपडेट

| Updated on: Apr 01, 2023 | 7:11 PM

आयपीएलच्या 16 व्या मोसमातील तिसरा सामना हा दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्याआधी दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने ऋषभ पंत याच्या कमबॅकबाबत मोठी अपडेट दिली आहे.

IPL 2023 | ऋषभ पंत यांची एन्ट्री? कॅप्टन डेव्हिड वॉर्नरकडून मोठी अपडेट
Follow us on

मुंबई | आयपीएल 2023 च्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने 4 वेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्सवर 5 विकेट्सने मात करत विजयी सुरुवात केली. त्यानंतर आज शनिवारी (1 एप्रिल) मोसमातील पहिल्या डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं. या डबल हेडरमधील पहिला सामना पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात आला. तर दुसरा सामना हा लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने माजी कर्णधार ऋषभ पंत याच्या खेळण्याबाबत मोठी अपडेट दिली आहे.

दिल्ली कॅपिट्ल्स या मोसमातील आपला पहिला सामना हा लखनऊ विरुद्ध खेळणार आहे. यंदा दिल्लीच्या नेतृत्वाची धुरा ही ऋषभ पंतऐवजी डेव्हिड वॉर्नर याच्याकडे आहे. पंत याचा डिसेंबर 2022 मध्ये रस्ते अपघात झाला होता. पंत यातून आता सावरतोय. त्यामुळे पंतला या मोसमाला मुकावं लागलंय. मात्र वॉर्नरने पंतच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट दिली आहे. पंत आपल्या प्रकृतीवर पूर्णपणे लक्ष देऊन आहे. तो लवकरच सावरेल आणि मैदानात परतेल, असं वॉर्नरने सांगितलं.

पंत विकेटकीपर आणि कर्णधार अशा दोन महत्वाच्या भूमिका बजावायचा. मात्र कर्णधारपदाची जबाबदारी दिल्ली कॅपिट्ल्सने टीम मॅनेजमेंटने डे्विड वॉर्नर याला दिली आहे. तर विकेटकीपर बॅट्समन म्हणून पंत याच्या जागी अभिषेक पोरेल याचा समावेश केला गेला आहे. पोरेल याला 20 लाख रुपये मोजून आपल्या टीममध्ये घेतलं आहे.

हे सुद्धा वाचा

अभिषेक याने 16 फर्स्ट क्लास आणि 3 लिस्ट ए सामन्यांमध्ये बंगळुरुचं प्रतिनिधित्व केलं आहे. पंत याच्या अपघातामुळे अभिषेक याला ही संधी मिळाली आहे. आता संपूर्ण मोसमात अभिषेक विकेटकीपिंग करताना दिसणार आहे. यामुळे अभिषेक कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

टीम दिल्ली कॅपिट्ल्स | डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन) , पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमॅन पॉवेल, अभिषेक पोरेल (विकेटकीपर) एनरिक नॉर्खिया, चेतन साकरिया, कमलेश नागरकोटी, सरफराज अहमद, यश धुळ, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, खलील अहमद, लुंगी एन्गिडी, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, मुस्तिफिजुर रहमान, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा , फिल साल्ट, मुकेश कुमार, मनीष पांडे आणि राइली रूसो.