IPL Final 2023 | पावसामुळे क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड; अंतिम सामन्याच्या तिकीटासाठी पुन्हा पैसे मोजावे लागणार?

| Updated on: May 29, 2023 | 12:44 AM

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 16 व्या मोसमातील अंतिम सामन्याचं आयोजन हे रविवारी 28 मे रोजी करण्यात आलं होतं. मात्र पाऊस झाल्याने खेळ न झाल्याने चाहत्यांची निराशा झाली.

IPL Final 2023 | पावसामुळे क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड; अंतिम सामन्याच्या तिकीटासाठी पुन्हा पैसे मोजावे लागणार?
Follow us on

मुंबई | क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, असं म्हटलं जात. क्रिकेटमध्ये कधी काय होईल, याचा अंदाजही बांधता येत नाही. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आयपीएल 16 व्या मोसमातील अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने आले. या सामन्याचं आयोजन 28 मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं. अंतिम सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी मैदानात मोठ्या उत्साहाने उपस्थिती लावली होती. गुजरात सलग दुसऱ्यांचा आयपीएल चॅम्पियन होणार की चेन्नई मुंबईच्या 5 आयपीएल ट्रॉफीची बरोबरी करणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं होतं.

उत्साही क्रिकेट चाहत्यांचा पावसाने हिरमोड केला. अहमदाबादमध्ये पाऊस बरसत होता. सामना सुरु होण्याआधीपासून पाऊस कधी जोरात तर रिपरिप पडत होता. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाऊस झाला. त्यामुळे खेळपट्टी झाकावी लागली. पाऊस आता थांबेल म्हणत क्रिकेट चाहते मैदानात प्रतिक्षा करत होते. मात्र अखेर रात्री 11 नंतर फायनल सामना राखीव दिवशी 29 मे रोजी खेळवण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

आता त्याच तिकीटावर सामना पाहता येणार की पुन्हा नव्याने तिकीट काढावी लागणार, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. याबाबत बीसीसीआयने मोठी अपडेट दिली आहे. क्रिकेट चाहत्यांना याच तिकीटावर अंतिम सामना स्टेडियममध्ये बसून पाहता येईल. मात्र त्यासाठी तिकीटची हार्डकॉपी सोबत ठेवण्याचं आवाहन हे बीसीसीआयने बिगस्क्रीनद्वारे केलं. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना अंतिम सामना पाहण्यासाठी पुन्हा तिकीटासाठी पैसे मोजण्याची गरज नाही.

ट्विटमध्ये काय म्हटलंय?

पावसामुळे क्रिकेट चाहच्यांचा हिरमोड

गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.

चेन्नई सुपर किंग्स टीम | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.