IPL 2023 : युवा आहे पण सचिनचा छावाय, अर्जुन तेंडुलकर याने गुजरातच्या बॅकबोन खेळाडूला केलं आऊट

अर्जुनने गुजरातचा आक्रमक सलामीवीर वृद्धिमान साहा याला आऊट केलं. आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये अर्जुनने त्याला माघारी धाडलं.

IPL 2023 : युवा आहे पण सचिनचा छावाय, अर्जुन तेंडुलकर याने गुजरातच्या बॅकबोन खेळाडूला केलं आऊट
| Updated on: Apr 25, 2023 | 8:39 PM

मुंबई : गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडिअन्स यांच्यामध्ये आपीएलमधील 35 वा सामना नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये सुरू आहे. मुंबई संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईला युवा अर्जुन तेंडुलकर याने पहिलं यश मिळवून दिलं आहे. अर्जुनने गुजरातचा आक्रमक सलामीवीर वृद्धिमान साहा याला आऊट केलं. आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये अर्जुनने त्याला माघारी धाडलं.

पाहा व्हिडीओ

 

 

अर्जुन याने पहिली ओव्हर मस्त टाकली, त्यानंतर संघाची तिसरी आणि आपंल वैयक्तित दुसऱ्या ओव्हरमध्येच अर्जुनने विकेट घेतली.  गुजरात्या 3 विकेटस् गेल्या असून यामध्ये शुबनमन गिल  याने  अर्धशतकी खेळी केली. त्याने 34 चेंडूत 56 धााव केल्या  यामध्ये 7 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. कर्णधार हार्दिक पंड्या , साहा, गिल आणि विजय शंकर आऊट झाला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

गुजरात टायटन्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. ऋद्धीमान साहा आणि शुबमन गिल सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. अर्जुन तेंडुलकर मुंबईकडून पहिली ओव्हर टाकत आहे.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, के कार्तिकेय सिंग, एन वडेरा, रायली मेरेडिथ, पीयूष चावला, अर्जुन तेंडुलकर आणि जेसन बेहरेनडॉर्फ.