IPL 2023 LSG vs DC | पापणी लवण्याआधीच गोळीसारखा निघून गेला बॉल, सलग 2 बोल्ड अन् दिल्लीची घसरगुंडी, पाहा Video

पॉवर प्लेचा दोघांनी पुरेपूर फायदा घेत एक चांगली सुरूवात केली होती. मात्र लखनऊचा एका बॉलरने सर्व काही उद्ध्वस्त करत दिल्लीची गाडी रूळावरून खाली खेचली.

IPL 2023 LSG vs DC | पापणी लवण्याआधीच गोळीसारखा निघून गेला बॉल, सलग 2 बोल्ड अन् दिल्लीची घसरगुंडी, पाहा Video
| Updated on: Apr 01, 2023 | 11:13 PM

मुंबई : दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांमध्ये सामना सुरू आहे. लखनऊ संघाने प्रथम फलंदाजी करताना 193 धावा केल्या आहेत. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली संघाने आक्रमक सुरूवात केली होती. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर मैदानात उतरले होते. पॉवर प्लेचा दोघांनी पुरेपूर फायदा घेत एक चांगली सुरूवात केली. मात्र लखनऊच्या एका बॉलरने सर्व काही उद्ध्वस्त करत दिल्लीची गाडी रूळावरून खाली खेचली.

नेमकं काय झालं?
पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सुरूवातील येत लखनऊच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला होता. पहिलीच ओव्हर टाकण्यासाठी आलेल्या मार्क वुड याने पहिल्याचं ओव्हरमध्ये दिल्लीला दोन धक्के देत सामना झुकवला. पृथ्वी शॉ आणि मिचेल मार्श यांना वुडने माघारी पाठवलं. पृथ्वीला काही समजण्याआधीच तो बोल्ड झाला त्यानंतर आलेल्या मार्शलाही त्याने खेळपट्टीवर टिकू दिलं नाही. इतकंच नाहीतर वुडने देशांतर्गत क्रिकेटमध्ये फॉर्ममध्ये असलेल्या सर्फराज खानलाही बाद करत सामन्यावरील पकड आणखी मजबूत केली.

पाहा व्हिडीओ-

 

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (C), काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (W), आयुष बडोनी, मार्क वुड, जयदेव उनाडकट, रवी बिश्नोई, आवेश खान

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (C), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, रिली रोसो, सरफराज खान (W), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, मुकेश कुमार