IPL 2023 | टीम इंडियाच्या दिशेने ‘यशस्वी’ वाटचाल, लवकरच एन्ट्री!

टीम इंडियाला येत्या काळात वनडे वर्ल्ड कप खेळायचा आहे. यशस्वीला आयपीएल निमित्ताने भारतातील जवळपास सर्व स्टेडियममध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे यशस्वी लवकरच टीम इंडियासाठी खेळताना दिसेल.

IPL 2023 | टीम इंडियाच्या दिशेने यशस्वी वाटचाल, लवकरच  एन्ट्री!
| Updated on: May 16, 2023 | 11:14 PM

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात मुंबईचा पोरगा यशस्वी जयस्वाल हा राजस्थान रॉयल्स टीमकडून खेळतोय. यशस्वीने या मोसमात दमदार बॅटिंगने आपली छाप सोडली आहे. यशस्वीने केलेल्या कामगिरीमुळे त्याची एकच चर्चा क्रीडा विश्वात रंगली आहे. यशस्वीची कामगिरी पाहता त्याला टीम इंडियात संधी देण्यात यावी, अशी मागणी करणाराही एक चाहता वर्ग आहे. यशस्वी लवकरच टीम इंडियासाठी खेळताना दिसेल, असा आशावाद जयस्वाल याचा वरिष्ठ सहकारी आणि इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट याने व्यक्त केला आहे. यामुळे टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यानंतर रुट यानेही यशस्वीबाबत सहमती दर्शवली आहे.

यशस्वीने या 16 व्या हंगामातील 13 सामन्यात 47.91 च्या सरासरीने 575 धावा केल्या. यामध्ये 4 अर्धशतक आणि 1 शतकाचा समावेश आहे. रुटच्याआधी शास्त्री यांनी यशस्वीबाबत भविष्यवाणी केली. यशस्वी लवकरच टीम इंडियासाठी खेळेल, अशी भविष्यवाणी शास्त्री यांनी केली होती.

रुट काय म्हणाला?

“यशस्वीला लवकरच तुम्ही टीम इंडियाकडून खेळताना पाहाल. यशस्वीमध्ये धावांची भूक आहे. यशस्वीला स्वत:वर विश्वास आहे. यशस्वी सातत्याने नवनवीन गोष्टी शिकतोय. त्याचा पॉझिटिव्ह एटीट्यूड आहे. तो दुसऱ्यांकडून शिकण्याचा प्रयत्न करतोय. तो परिपूर्ण खेळाडू आहेत, त्याच्यात कोणतीही उणीव नाही. यशस्वीने फिरकी आणि वेगवान गोलंदाजांचा शानदार पद्धतीने सामना केला आहे. यातून यशस्वीच्या आत्मविश्वासाचं दर्शन होतं”, असं रुट याने स्पष्ट केलं.

“यशस्वीला आयपीएलमधील हा अनुभव आगामी वनडे वर्ल्ड कपसाठी फायदेशीर ठरेल. यशस्वीला या परिस्थितीत खेळण्याच्या अनुभवाचा फायदा होईल. वेगवेगळ्या पीचवर खेळल्याने त्याला कधी कुठे आणि कसं खेळायचं याचा अनुभव हा वर्ल्ड कपच्या हिशोबाने फायदेशीर ठरेल”, असं रूटने म्हटलं.

रुट पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळतोय. रुटने इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबातही आपलं मत मांडलं. “इम्पॅक्ट प्लेअर नियम समजण्यात आणखी 2-3 वर्ष जातील. या नियमाचा वापर कसा करायाचा आणि याचा परिणाण काय होईल, हे जाणून घेण्यासाठी काही वेळ जाईल”, असं रुटने स्पष्ट केलं.