Anushka Sharma | अनुष्का शर्मा हीच्यामुळेच आरसीबी हरली, एक्ट्रेस सोशल मीडियावर ट्रोल

| Updated on: May 22, 2023 | 8:43 PM

रॉयल चॅलेंजर्स बगंळुरुला गुजरात टायटन्सकडून मस्ट विन मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला. नेटकऱ्यांनी आरसीबीच्या या पराभवाला विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्मा हीला जबाबदार धरत टीका केलीय.

Anushka Sharma | अनुष्का शर्मा हीच्यामुळेच आरसीबी हरली, एक्ट्रेस सोशल मीडियावर ट्रोल
Follow us on

बंगळुरु | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमला 21 मे रोजी आयपीएल 16 व्या मोसमातील साखळी फेरीतील शेवटच्या आणि करो या मरोच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभव स्विकारावा लागला. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहण्यासाठी हा मस्ट विन सामना होता. मात्र गुजरात टायटन्स टीमने आरसीबीचा गेम करत 6 विकेट्सने विजय मिळवला. आरसीबीचा या पराभवासह साखळी फेरीतच बाजार उठला. तर या आरसीबीचा हा पराभव मुंबई इंडियन्सच्या पथ्यावर पडला. मुंबईला आरसीबीच्या या पराभवानंतर प्लेऑफची लॉटरी लागली.

आरसीबीने विराट कोहली याच्या शतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सला विजयासाठी 198 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरातने हे आव्हान शुबमन गिल याच्या नाबाद सेंच्युरीमुळे 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. थोडक्यात काय तर शुबमन गिल याच्या शतकासमोर विराट कोहली याचं शतक व्यर्थ ठरलं. या पराभवामुळे आरसीबीचं चॅम्पियन होण्याची प्रतिक्षा आणखी एका वर्षाने वाढली.

या सामन्याला आरसीबीचा आक्रमक फलंदाज विराट कोहली याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ही उपस्थित होती. बास्स हाच एक धागा नेटकऱ्यांनी धरला. या नेटकऱ्यांनी आरसीबीच्या पराभवासाठी अनु्ष्काला कारणीभूत धरत ट्रोल करायला सुरुवात केलीय. अनुष्का सामना पाहायला आली, इथेच आरसीबीने मॅच गमावली असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

विराटचं गुजरात विरुद्धचं पहिलं आणि मोसमातील दुसरं शतक ठरलं. विराटने याआधी 18 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध शतक ठोकलं होतं. विशेष बाब म्हणजे या सामन्यात विराटने विजयी धावांचा पाठलाग करताना हे शतक केलं होतं. या सामन्यात विराटतं शतक हे आरसीबीसाठी फायदेशीर ठरलं. विराट या विजयानंतर अनुष्कासोबत भरमैदानातच व्हीडिओ कॉलवर बोलला होता. नेटकऱ्यांनी हा मुद्दाही अचूक धरत अनुष्काला ट्रोल केलंय.

अनुष्का ट्रोल, मीम्स व्हायरल

अनुष्कावर आरसीबीच्या पराभवानंतर टीका

अनुष्का हैदराबादप्रमाणे गुजरात विरुद्धच्या सामन्यातही आली नसती, तर आरसीबी जिंकली असती. तसेच विराटचं हे मोसमातील दुसरं शतकंही सार्थकी लागलं असतं, असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलंय. काही ट्रोलर्सनी तर कहर केलाय. या ट्रोलर्सनी अनुष्का आणि रोहित शर्मा याची पत्नी रितीका याच्यासोबत तुलना केली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, मायकेल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज आणि विजयकुमार वैशाख.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कर्णधार), शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), दासुन शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी आणि यश दयाल.