RR vs KKR IPL 2023 : प्रेक्षकांना वाटलं षटकार, पण चित्त्याच्या वेगाने तो आला आणि असं केलं की जेसन रॉय थेट तंबूत, Video Viral

IPL 2023 स्पर्धेतील महत्त्वाचा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. या सामन्यात दोन अप्रतिम झेल पाहायला मिळाले. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

RR vs KKR IPL 2023 : प्रेक्षकांना वाटलं षटकार, पण चित्त्याच्या वेगाने तो आला आणि असं केलं की जेसन रॉय थेट तंबूत, Video Viral
RR vs KKR IPL 2023 : जेसन रॉयने फटका मारत चेंडू थेट सीमारेषे पारच नेला, पण झालं की...Watch Video
| Updated on: May 11, 2023 | 8:16 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होत आहे. हा सामना दोन्ही संघांना प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतील यात काही दुमत नाही. याची प्रचिती राजस्थानच्या गोलंदाजीवेळी दिसून आली. सलग तीन सामन्यात पराभव झाल्यानंतर राजस्थाननं धडा घेतल्याचं दिसत आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण या सामन्यात दिसून आलं. जेसन रॉय आणि रहमानउल्ला गुरबाज यांचे जबरदस्त झेल घेतले.

पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्याचा प्रयत्न असतो. यासाठी सलामीचे फलंदाज आक्रमक खेळी करतात. जेसन रॉय आणि रहमानउल्ला गुरबाज यांनी सावध खेळी केल्यानंतर फटकेबाजीसाठी पुढाकार घेतला. तिसऱ्या षटकापासून जेसन रॉय आक्रमक झाला. पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. मात्र ट्रेंट बोल्टच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला पण शिमरॉन हेटमायरने त्याचा अप्रतिम झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला.

पॉवर प्लेमध्ये संघावर आलेला दबाव दूर करण्यासाठी हमानउल्ला गुरबाजने पुढाकार घेतला. संदीप शर्माच्या चौथ्या षटकातील पहिल्या दोन चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकले. ट्रेंट बोल्टच्या पाचव्या षटकातील पहिल्या चेंडू लाँग ऑफच्या दिशेने चौकार मारण्याचा प्रयत्न केला. पण संदीप शर्माने अप्रतिम झेल घेतला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, केएम आसिफ, युझवेंद्र चहल

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.