IPL 2024 DC vs MI Live Streaming : दिल्ली-मुंबई दुसऱ्यांदा आमनेसामने, कोण जिंकणार?

Delhi Capitals vs Mumbai Indians Live Streaming : दिल्ली कॅपिट्ल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांसाठी हा सामना प्लेऑफच्या हिशोबाने अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

IPL 2024 DC vs MI Live Streaming : दिल्ली-मुंबई दुसऱ्यांदा आमनेसामने, कोण जिंकणार?
bumrah ishan hardik and rishabh pant mi vs dc ipl 2024,
Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 26, 2024 | 4:03 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 43 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. ऋषभ पंत दिल्लीचं नेतृत्व करणार आहे. तर हार्दिक पंड्या याच्याकडे मुंबईची धुरा आहे. दिल्ली आणि मुंबई दोन्ही संघांची ही या हंगामात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे. याआधी 7 एप्रिलला मुंबई विरुद्ध दिल्ली असा सामना झाला होता. तेव्हा मुंबईने सलग 3 पराभवानंतर दिल्ली विरुद्ध चौथ्या सामन्यात 29 धावांनी मात करत विजयाचं खातं उघडलं होतं. त्यामुळे आता दिल्लीचा मुंबईवर मात करत या पराभवाचा वचपा घेण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबई विजय मिळवून प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी सज्ज आहे.

पॉइंट्सटेबलमध्ये कोण कुठे?

दिल्लीचा हा या हंगामातील 10वा आणि मुंबईचा 8वा सामना असणार आहे. दिल्लीने 9 पैकी 4 सामने जिंकले आहेत. दिल्ली 8 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी आहे. तर मुंबईने 8 पैकी फक्त 3 विजय आणि 6 गुणांसह आठव्या स्थानी आहे.

दिल्ली विरुद्ध मुंबई सामना केव्हा?

दिल्ली विरुद्ध मुंबई सामना शनिवारी 27 एप्रिल रोजी होणार आहे.

दिल्ली विरुद्ध मुंबई सामना कुठे?

दिल्ली विरुद्ध मुंबई सामना अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली येथे होणार आहे.

दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 3 वाजता टॉस होईल.

दिल्ली विरुद्ध मुंबई सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

दिल्ली विरुद्ध मुंबई सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

दिल्ली विरुद्ध मुंबई सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

दिल्ली विरुद्ध मुंबई सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर मोफत पाहायला मिळेल.

दिल्ली कॅपिट्ल्स टीम : ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अभिषेक पोरेल, रिकी भुई, यश धुल, शाई होप, पृथ्वी शॉ, ट्रिस्टन स्टब्स, कुमार कुशाग्रा, स्वस्तिक चिकारा, इशांत शर्मा, झाय रिचर्डसन, रसिक दार सलाम, विकी ओस्तवाल, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, कुलदीप यादव, प्रवीण यादव. दुबे, खलील अहमद, सुमित कुमार, अक्षर पटेल, मिचेल मार्श, ललित यादव आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क.

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पीयुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.