IPL 2024, DC vs SRH : दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्यात हे खेळाडू ठरतील हिरो! जाणून घ्या

| Updated on: Apr 19, 2024 | 3:50 PM

दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल स्पर्धेतील 35 वा सामना होत आहे. दिल्लीसाठी प्रत्येक सामना हा महत्त्वाचा आहे. तर सनरायझर्सला एक पराभव महागात पडू शकतो अशी स्थिती आहे. त्यामुळे प्लेऑफच्या प्रत्येक सामन्याची रंगत वाढली आहे.

IPL 2024, DC vs SRH : दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्यात हे खेळाडू ठरतील हिरो! जाणून घ्या
IPL 2024, DC vs SRH : दिल्ली हैदराबादमधील हे खेळाडू धावा आणि विकेट्सच्या बाबतीत ठरतील उजवे
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेत खऱ्या अर्थाने प्लेऑफचा लढा सुरु झाला आहे. गणिती भाषेत सांगायचं तर प्रत्येक संघाला अजूनही प्लेऑफची वाट मोकळी आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्याचं महत्त्व येथून पुढे वाढलं आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल स्पर्धेतील 35 वा सामना रंगणार आहे. गुणतालिकेत सनरायझर्स हैदराबाद संघ 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर दिल्लीचा संघ 6 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. त्यामुळे या सामन्यात रंगत पाहायला मिळणार आहे. दिल्लीचा स्पर्धेतील आठवा, तर हैदराबादचा सातवा सामना आहे. दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात आतापर्यंत 23वेळा लढत झाली आहे. यात दिल्लीने 11 वेळा, तर हैदराबादने 12 वेळा सामना जिंकला आहे. दिल्लीने हैदराबादविरुद्ध सर्वाधिक 207, तर हैदराबादने दिल्लीविरुद्ध सर्वाधिक 219 धावा पटकावल्या आहेत.

दिल्ली आणि हैदराबाद यांच्यातील सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात रंगणार आहे. एक काळ असा होता की ही खेळपट्टी धीमी होती आणि गोलंदाजांना मदत करायची. पण 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेदरम्यात यात बदल केला गेला. आता ही खेळपट्टी फलंदाजांना मदत करते. तसेच या खेळपट्टीवर अधिकाअधिक धावा होऊ शकतात. या मैदानात आतापर्यंत 85 आयपीएल सामने पार पडले आहेत. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने 46 वेळा सामना जिंकला आहे. त्यामुळे या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल.

या सामन्यात दिल्लीच्या 6, तर हैदराबादच्या 5 खेळाडूंवर मदार असणार आहे. दिल्लीकडून ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जेक फ्रेझर-मॅकगर्क या खेळाडूंकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. तर हैदराबादच्या एडन मार्कराम, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंकडे नजर असणार आहे. सामना या 11 खेळाडूंभोवती फिरेल असंच मागच्या अंदाजावरून तरी दिसत आहे.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर / कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा.

इम्पॅक्ट प्लेयर: खलील अहमद.

सनरायझर्स हैदराबाद: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, के नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट, भुवनेश्वर कुमार

इम्पॅक्ट प्लेयर: टी नटराजन.