IPL 2024 Final, KKR vs SRH : श्रेयस अय्यरने सामन्यापूर्वीच फुंकलं कोलकात्याच्या विजयाचं रणशिंग, स्पष्टच सांगितलं की…

आयपीएल 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल सनरायझर्स हैदराबादने जिंकला. मात्र आपल्या मनासारखं झाल्याचं कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यर याने सांगितलं. नेमकं काय झालं वाचा

IPL 2024 Final, KKR vs SRH : श्रेयस अय्यरने सामन्यापूर्वीच फुंकलं कोलकात्याच्या विजयाचं रणशिंग, स्पष्टच सांगितलं की...
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 26, 2024 | 7:21 PM

आयपीएल 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने जिंकला. पॅट कमिन्सने क्षणाचाही विलंब न करता फलंदाजीचा निर्णय घेतला. रात्रीच्या प्रहरात दव पडण्याची शक्यता कमी असल्याचं कारण देत त्याने हा निर्णय घेतला. तसेच सुरुवातीला फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस आहे. पॅट कमिन्स म्हणाला की, “आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. एक चांगली विकेट दिसते, मागच्या सामन्यात वेगळ्या विकेटवर खेळलो. आमचा आक्रमक खेळ प्रत्येक वेळी काम करत नाही, पण जेव्हा तो होतो तेव्हा तो खूप त्रासदायक असतो. त्या रात्री दव नव्हते, मला वाटत नाही की आज काही असेल, मला प्रथम बॅटने क्रॅक करायचे आहे. आम्ही बचावात चांगली कामगिरी केली आहे.”

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं की, “आम्ही गोलंदाजी केली असती, खेळपट्टी कशी खेळेल याची आम्हाला चांगली कल्पना आहे. ही लाल माती आहे आणि आम्ही आमचा शेवटचा खेळ याच खेळपट्टीवर झला. आपण वर्तमानात राहणे, मूलभूत गोष्टींवर टिकून राहणे आणि आपल्या सर्व योजना अंमलात आणणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती जबाबदारी घेत आहे, हा एक मोठा खेळ आहे, आमच्याकडे बरेच लोक आहेत जे पहिल्यांदाच अंतिम फेरीत खेळत आहेत. परंतु ही देखील एक चांगली संधी आहे. आम्ही त्याच टीमसोबत जात आहोत”

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

कोलकाता नाईट रायडर्स इम्पॅक्ट प्लेयर्स: अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेरफेन रदरफोर्ड

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.

सनरायझर्स हैदराबाद इम्पॅक्ट प्लेयर्स: उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर