
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 33 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने गुजरात टायटन्सला त्यांच्या नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद या होम ग्राउंडमध्ये लोळवळं आहे. दिल्लीने गुजरात वर 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. दिल्लीचा हा सलग दुसरा विजय ठरलाय. तसेच दिल्लीचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. गुजरातने दिल्लीला विजयासाठी 90 धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्लीने हे आव्हान 4 विकेट्स गमावून 8.5 ओव्हरमध्ये 67 बॉलआधी पूर्ण केलं. दिल्लीने विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेपही घेतली.
गुजरातकडून मिळालेल्या 90 धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या 6 फलंदाजांनी या आव्हानापर्यंत पोहचवण्यात हातभार लावला. दिल्लीकून ओपनर जेक फ्रेझर-मॅकगर्क याने सर्वाधिक 20 धावांची खेळी केली. जेक फ्रेझर-मॅकगर्क याने 10 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह 200 च्या स्ट्राईक रेटने 20 धावा केल्या. पृथ्वी शॉ 7 धावांवर बाद झाला. अभिषेक पोरेल याने 15 धावा ठोकल्या. शाई होप याने विजयात 19 धावांचं योगदान दिलं. तर ऋषभ पंत आणि सुमीत कुमार या जोडीने दिल्लीला विजयापर्यंत पोहचवलं. कॅप्टन ऋषभ पंतने 11 बॉलमध्ये नाबाद 16 धावा केल्या. तर सुमीत कुमार 9 बॉलमध्ये 9 धावा करुन नॉट आऊट परतला. तर गुजरातकडून संदीप वॉरियर याने 2 विकेट्स घेतल्या. तर स्पेंसर जॉन्सन आणि राशिद खान या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
दिल्लीचा आयपीएलच्या इतिहासातील बॉलबाबत सर्वात मोठा विजय ठरला आहे. दिल्लीने आज 67 बॉलआधी विजयी आव्हान पूर्ण केलं. तर त्याआधी दिल्लीने 2022 साली पंजाब किंग्स विरुद्ध 57 चेंडू राखून विजय मिळवला होता. तर 2012 साली चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 42 चेंडूआधी विजय मिळवला होता.
दिल्लीने या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. मोठ्या फरकाने विजय मिळवल्याने दिल्लीचा नेट रनरेट चांगलाच सुधारला आहे. दिल्लीने विजयासह नवव्या क्रमांकावरुन थेट सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. दिल्लीचा नेट रनरेट हा सामन्याआधी -0.97 असा होता तो आता विजयानंतर 0.074 असा झाला आहे. तर दिल्लीमुळे मुंबईची आता आठव्यावरुन नवव्या स्थानी घरसण झाली आहे. तर गुजरातला एका स्थानाचा फटका बसला आहे. गुजरात सहाव्यावरुन सातव्या स्थानी पोहचली आहे.
गुजरात टायटन्स प्लेईंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुधारसन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, स्पेन्सर जॉन्सन आणि संदीप वॉरियर.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स, शाई होप, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मुकेश कुमार आणि खलील अहमद.