IPL 2024 GT vs DC : दिल्लीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, प्लेईंग ईलेव्हनमध्ये मोठे बदल

Gujarat Titans vs Delhi Capitals Toss : दिल्ली कॅपिट्ल्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. दिल्ली गुजरात विरुद्ध पहिले बॉलिंग करणार आहे.

IPL 2024 GT vs DC : दिल्लीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, प्लेईंग ईलेव्हनमध्ये मोठे बदल
gt vs dc toss ipl 2024,
Follow us
| Updated on: Apr 17, 2024 | 7:24 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 32 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. शुबमन गिल गुजरातचं आणि ऋषभ पंत दिल्लीचं नेतृत्व करणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकला आहे. दिल्ली कॅपिट्ल्सचा कॅप्टन ऋषभ पंत याने बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये अनेक बदल झाले आहेत. दिल्लीचा ओपनर आणि अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नर या सामन्यात खेळणार नाहीय. वॉर्नरच्या जागी सुमित कुमार याचा समावेश करण्यात आला आहे. तर गुजरात प्लेईंग ईलेव्हनमध्ये ऋद्धीमान साहा आणि डेव्हिड मिलर या दोघांचं कमबॅक झालं आहे. तसचे संदीप वॉरियर याला पदार्पणाची संधी मिळाली आहे. संदीपला उमेश यादव याच्या जागी संधी देण्यात आली आहे. गुजरातच्या टीममध्ये 4 आणि दिल्लीच्या टीममध्ये 3 विदेशी खेळाडू आहेत. गुजरातमध्ये डेविड मिलर, राशिद खान, नूर अहमद आणि स्पेंसर जॉनसन यांचा समावेश आहे. तर दिल्ली टीममध्ये जॅक फ्रेजर-मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स आणि शाई होप या तिघांचा समावेश आहे.

गुजरात आणि दिल्ली या दोन्ही संघांचा या हंगामातील सातवा सामना आहे. शुबमनच्या नेतृत्वात गुजरातने 3 सामने जिंकले आहेत आणि तितकेच गमावेल आहेत. गुजरात पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी आहे. तर दुसऱ्या बाजूला दिल्ली कॅपिट्ल्सने 6 पैकी 2 सामने जिंकून 4 गमावले आहेत. दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये शेवटून दुसऱ्या अर्थात नवव्या स्थानी आहे.

दिल्लीने टॉस जिंकला

गुजरात टायटन्स प्लेईंग ईलेव्हन :  शुबमन गिल (कॅप्टन), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुधारसन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, स्पेन्सर जॉन्सन आणि संदीप वॉरियर.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स, शाई होप, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मुकेश कुमार आणि खलील अहमद.

Non Stop LIVE Update
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?.
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला.
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा.