‘ऑपरेशन धनुष्यबाण’; श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात मोठा राजकीय भूकंप

कल्याण लोकसभा मतदारसंघाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. महायुतीत कल्याण लोकसभेची जागा कुणाला सुटेल? यापासून ते कल्याणचा उमेदवार कोण असेल? श्रीकांत शिंदे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही? अशा अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. अखेर श्रीकांत शिंदे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली. श्रीकांत शिंदे यांच्याकडून प्रचाराचा धडाका सुरु आहे. असं असताना आता श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत 'ऑपरेशन धनुष्यबाण' राबवत ठाकरे गटाला मोठं खिंडार पाडलं आहे.

'ऑपरेशन धनुष्यबाण'; श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात मोठा राजकीय भूकंप
खासदार श्रीकांत शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 5:08 PM

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे जोरदार घडामोडी घडत आहेत. आतापर्यंत लोकसभेच्या दोन टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. महाराष्ट्रात अजूनही लोकसभेच्या तीन टप्प्यांसाठीचं मतदान बाकी आहे. तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान हे 7 मे ला होणार आहे. तर चौथ्या टप्प्यातील मतदान हे 13 मे आणि पाचव्या टप्प्यातील मतदान हे 20 मे ला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातही पाचव्या टप्प्यात 20 मे ला मतदान होणार आहे. या मतदारसंघात आज मोठा राजकीय भूकंप घडताना दिसत आहे. कारण शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे डोंबिवलीमधील अतिशय महत्त्वाचे, प्रतिष्ठित आणि मोठे स्थानिक पदाधिकारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या युवासेनाचे प्रमुख आदित्य ठाकरे हे आज कल्याण-डोंबिवली शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या याच दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाला मोठं खिंडार पाडलं आहे. डोंबिवलीमधील ठाकरे गटाच्या बड्या पदाधिकाऱ्यांचं आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान अवघ्या 20 दिवसांवर असताना पक्षाच्या बड्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना पाठ दाखवणं हे पक्षासाठी फायद्याचं नाही.

श्रींकात शिंदे यांना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचं आव्हान

डोंबिवलीत शिवसेनेच्या दोन्ही गटाचे उमेदवार समोरासमोर आहेत. शिंदे गटाकडून मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. श्रीकांत शिंदे हे गेल्या 10 वर्षांपासून कल्याण लोकसभेचे खासदार आहेत. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वैशाली दरेकर यांच्याकडून मतदारसंघात जोरदार प्रचार केला जातोय. पण त्यांच्या पक्षाच्या बड्या पदाधिकाऱ्यांचा आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी देखील हा मोठा झटका मानला जातोय.

डोंबिवलीत ठाकरेंच्या ‘या’ पदाधिकाऱ्यांचा होणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

  • विवेक खामकर – शहरप्रमुख
  • कवीता गावंड – महिला जिल्हासंघट
  • कलीना शिर्के – युवती सेना जिल्हाधिकारी
  • किरण मोंडकर – उपशहर संघटक
  • राधिका गुप्ते – कल्याण पूर्व विधानसभा संघटक
  • राजेंद्र नांदुस्कर – उपशहर संघटक
  • श्याम चौगुले – विभाग प्रमुख
  • सुधीर पवार – विभाग प्रमुख
  • शिवराम हळदणकर – विभाग प्रमुख
  • नरेंद्र खाडे – उपविभाग प्रमुख
  • सतीश कुलकर्णी – उपविभाग प्रमुख
  • प्रशांत शिंदे – उपविभाग प्रमुख
  • प्रसाद चव्हाण – शाखाप्रमुख
  • विष्णू पवार – शाखाप्रमुख
  • मयूर जाधव – शाखाप्रमुख
Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.