टी20 वर्ल्डकप 2022 आणि 2024 टीम इंडियात किती बदल? उपकर्णधाराचा कापला पत्ता आणि कोणला संधी ते जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया दुसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप खेळणार आहे. 2022 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडने 10 विकेट्स राखून पराभूत केलं होतं. आताच्या आणि तेव्हाच्या संघात किती बदल ते जाणून घ्या.

टी20 वर्ल्डकप 2022 आणि 2024 टीम इंडियात किती बदल? उपकर्णधाराचा कापला पत्ता आणि कोणला संधी ते जाणून घ्या
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 5:16 PM

आयपीएल स्पर्धेची रंगत चढली असताना टी20 वर्ल्डकप स्पर्धेचे वेध सुरु झाले आहेत. एकूण 20 संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी होणार आहेत. टीम इंडिया अ गटात असून यात पाकिस्तान, अमेरिका, आयर्लंड आणि कॅनडा या संघांचा समावेश आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडसोबत आहेत. या स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात 15 खेळाडूंचा संघ बीसीसीआयने जाहीर केला आहे. यात काही जणांना डावलून बीसीसीआय निवड समितीने आश्चर्याचा धक्का दिला आहे. तर काही खेळाडूंवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल याचा टी20 वर्ल्डकप संघातून पत्ता कापला आहे. केएल राहुल टी20 वर्ल्डकप 2022 मध्ये उपकर्णधार होता. मात्र आता त्याला संघात स्थान मिळालेलं नाही. आता केएल राहुल ऐवजी हार्दिक पांड्या टी20 वर्ल्डकप संघात उपकर्णधार असणार आहे. 2022 आणि 2024 टी20 वर्ल्डकप संघात नेमके कोणते खेळाडू खेळले त्याबाबत जाणून घेऊयात..

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल हे खेळाडू 2022 च्या वर्ल्डकपमध्ये खेळले होते. पुन्हा एकदा आताच्या वर्ल्डकपमध्ये हे खेळाडू खेळताना दिसणार आहेत. तर यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, शिवम दुबे,रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे खेळाडू या वर्षीच्या वर्ल्डकप संघात नव्याने असतील. तर केएल राहुल, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, दीपक हुडा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि हर्षल पटेल हे खेळाडू नसतील.

टीम इंडिया, 2024 टी20 वर्ल्डकप : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

टीम इंडिया, 2022 टी20 वर्ल्डकप: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, दीपक हुडा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल .

Non Stop LIVE Update
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....