IPL 2024, KKR vs PBKS : कोलकाता पंजाबच्या सामन्यात या खेळाडूंची असेल चलती! कोण ते जाणून घ्या

| Updated on: Apr 25, 2024 | 3:38 PM

आयपीएल स्पर्धेतील 42वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच हे दोन संघ आमनेसामने येत आहेत. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. या सामन्यात कोणते खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावतील ते जाणून घेऊयात

IPL 2024, KKR vs PBKS : कोलकाता पंजाबच्या सामन्यात या खेळाडूंची असेल चलती! कोण ते जाणून घ्या
Follow us on

आयपीएल स्पर्धेतील 42व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने येत आहेत. 26 एप्रिलला हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होत आहे.कोलकाता नाईट रायडर्स संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर पंजाब किंग्स संघ नवव्या स्थानावर विराजमान आहे. पंजाब किंग्सला या सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागेल. अन्यथा प्लेऑफच्या शर्यतीतून पत्ता कापला जाईल. कोलकाता नाईट रायडर्सने मागच्या सामन्यात आरसीबीवर थरारक विजय मिळवला होता. तर पंजाब किंग्सला मागच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. कोलकात्या विरुद्धच्या सामन्यातही सॅम करन याच्याकडेच धुरा असणार आहे. आयपीएल इतिहास पाहता कोलकाता नाईट रायडर्स पंजाब किंग्सवर भारी पडल्याचं दिसत आहे.

कोलकाता आणि पंजाब किंग्स 32 वेळा आमनेसामने आले आहेत. यात 21 वेळा कोलकात्याने, तर 11 सामन्यात पंजाबने बाजी मारली आहे. या पर्वात दोन्ही संघ पहिल्यांदाच भिडणार आहेत. या सामन्यात कोलकात्याकडून सहा, तर पंजाबकडून पाच खेळाडूंवर नजर असेल. कोलकाता नाईट रायडर्सकडून फिलिप सॉल्ट, श्रेयस अय्यर, सुनील नरीन, आंद्रे रसेल, मिचेल स्टार्क आणि वरुण चक्रवर्तीचा समावेश असेल. तर पंजाब किंग्सकडून लियाम लिविंगस्टोन, सॅम करन, हर्षल पटेल, कगिसो रबाडा आणि अर्शदीप सिंह यांच्यावर नजर असेल.

ईडन गार्डनवरची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली आहे. बाँड्री खूप लांब नाही वरून आऊटफिल्ड खूप फास्ट आहे. त्यामुळे फलंदाजांना मदत होईल. खेळपट्टीवर चेंडू बऱ्यापैकी उसळी घेतो. त्यामुळे फटकेबाजी करताना चेंडू बरोबर पट्ट्यात येईल. वेगवान गोलंदाजांना थोडा बाउंस मिळेल. शेवटच्या टप्प्यात फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील. उसळीमुळे थोड्या अधिक प्रमाणात फिरकीपटूंनाही मदत होईल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

कोलकाता नाईट रायडर्स : फिल सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती. इम्पॅक्ट प्लेयर: शेरफेन रदरफोर्ड.

पंजाब किंग्स : सॅम कुरान (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग. इम्पॅक्ट प्लेयर: अथर्व तायडे.