LSG vs CSK : लखनऊने चेन्नई विरुद्ध टॉस जिंकला, पहिले बॅटिंग कुणाची?

| Updated on: Apr 19, 2024 | 7:38 PM

Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Toss : लखनऊ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकला आहे. पाहा दोन्ही टीमची प्लेईंग ईलेव्हन.

LSG vs CSK : लखनऊने चेन्नई विरुद्ध टॉस जिंकला, पहिले बॅटिंग कुणाची?
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 34 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत.ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद सांभाळणार आहे. तर केएल राहुल याच्याकडे लखनऊ सुपर जायंट्सच्या नेतृत्वाची धुरा आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी लखनऊमधील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. लखनऊ सुपर जायंट्सने टॉस जिंकला. कॅप्टन केएल राहुल याने फिल्डिंगचा निर्णय घेत चेन्नई सुपर किंग्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

दोन्ही संघात बदल

चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केला आहे. चेन्नईने 2 बदल केले आहेत. डॅरेल मिचेल याच्या जागी मोईन अली याचा समावेश करण्यात आला आहे. तर ऑलराउंडर दीपक चाहर याचा समावेश करण्यात आला आहे. तर शार्दूल ठाकुर याला बाहेर बसवलं आहे. शामर जोसेफ बाहेर झाला आहे. तर शामरच्या जागी मॅट हॅन्री याला संधी दिली आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड

दरम्यान आयपीएलच्या इतिहासात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात एकूण 3 सामने झाले आहेत. त्यापैकी 1 सामना हा रद्द झालाय. तर उर्वरित 2 सामन्यांमधून चेन्नई आणि लखनऊ दोघांनी प्रत्येकी 1-1 सामान जिंकला आहे. त्यामुळे आकडेवारीनुसार दोन्ही संघ हे तुल्यबळ आहेत.

लखनऊ टॉसचा बॉस

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान आणि मथीशा पाथीराना.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, मार्कस स्टोयनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान आणि यश ठाकुर.