MI vs KKR : मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर हार्दिक पांड्याने अखेर मौन सोडलं, सामन्यानंतर स्पष्ट काय ते बोलून टाकलं

आयपीएल 2024 स्पर्धेच्या 60 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगला. या सामन्यात तरी मुंबई इंडियन्स काहीतरी खास करेलं असं वाटत होतं. मात्र पुन्हा एकदा पदरी निराशा पडली आहे. कोलकात्याने स्पर्धेत दुसऱ्यांदा पराभूत केल्यानंतर हार्दिक पांड्याने आतापर्यंतचं सर्व काय ते बाहेर काढलं.

MI vs KKR : मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर हार्दिक पांड्याने अखेर मौन सोडलं, सामन्यानंतर स्पष्ट काय ते बोलून टाकलं
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 12, 2024 | 12:59 AM

आयपीएल 2024 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकला. मात्र वानखेडेसारखी स्थिती ईडन गार्डनवर झाली. मुंबईच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. मोक्याच्या क्षणी विकेट गमवल्या. तसेच धावगती कायम ठेवण्यात अपयश आलं. मुंबई इंडियन्सचा या स्पर्धेतील नववा पराभव आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स आत्मसन्माची लढाई फेल गेली असंच म्हणावं लागेल. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सने सलग दुसऱ्यांदा मुंबई इंडियन्सला पराभूत केलं. या विजयासाठी कोलकाता प्लेऑफमध्ये अधिकृतरित्या पात्र होणारा पहिला संघ ठरला आहे. या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्याने संपूर्ण स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या कामगिरीबाबत थेट भाष्य केलं. मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलं असलं तरी साखळी फेरीतील शेवटचा सामना लखनौ सुपर जायंट्ससोबत आहे. हा सामना लखनौसाठी खूपच महत्त्वाचा आहे.

“पराभव पचवणं खरंच खूप कठीण आहे. फलंदाजी युनिट म्हणून आम्ही अपयशी ठरलो. सुरुवात चांगली करून दिली होती. मात्र त्याचं विजयात रुपांतर करण्यात आम्ही अपयशी ठरलो. धावांची गती राखता आली नाही. विकेट थोडी वर खाली होती. तसेच चिकट झाली होती. त्यामुळे धावांची गती राखणं खूपच महत्त्वाचं होतं. अशा परिस्थितीत गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. सीमेवरून आलेला प्रत्येक चेंडू ओला होता. पण गोलंदाजांनी असं असूनही चांगली गोलंदाजी केली.”, असं कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला.

हार्दिक पांड्याला पुढच्या सामन्याच्या रणनितीबाबत विचारलं गेलं, तेव्हा त्याने पाठचं सर्वच उरकून काढलं. “पुढच्या सामन्यात काहीही रणनिती नाही. फक्त सामना खेळून आनंद घ्यायचा आहे. चांगलं क्रिकेट खेळायचं आहे हे माझं सुरुवातीपासून ध्येय आहे. या पर्वात आम्ही साजेशी कामगिरी करू शकलो नाही, असं मला वाटतं.”, असं कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला. कोलकात्याने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 158 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र मुंबई इंडियन्स संघ 8 गडी बाद 139 धावा करू शकला. मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव झाला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन) : इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.