
आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची कामगिरी हवी तशी झाली नाही. सुरुवातीचे तीन सामने गमवल्याने मुंबई इंडियन्सचे चाहते नाराज झाले होते. मात्र चौथ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कमबॅक केलं आणि दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गाडी विजयाच्या ट्रॅकवर आणली आहे. आता हा ट्रॅक कायम ठेवण्याचं आव्हान हार्दिक पांड्यावर असणार आहे. कारण मुंबई इंडियन्सची सूत्र हाती घेतल्यापासून संघाला हवी तशी गती मिळाली नाही. आता मुंबई इंडियन्स या स्पर्धेतील पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसोबत खेळणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ तितकीच ताकद लावणार आहे. असं सर्व चित्र असताना मुंबई इंडियन्स संघात या सामन्यापूर्वी एक बदल करण्यात आला आहे. संघात युवा खेळाडू हार्विक देसाईची एन्ट्री झाली आहे. कारण विकेटकीपर विष्णु विनोद स्पर्धेतून बाहेर गेला आहे. त्याच्याऐवजी आता संघात हार्विक देसाई खेळणार आहे.
विकेटकीपर बॅट्समन विष्णु विनोदला हाताला दुखापत झाल्याने स्पर्धेला मुकावं लागलं आहे. त्याची जागा भरून काढण्यासाठी मुंबई इंडियन्सने विकेटकीपर बॅट्समन हार्विक देसाईला पसंती दिली आहे. हार्विक देसाई 24 वर्षांचा असून त्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक झळकावलं आहे. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत खेळला आहे. 2018 मध्ये वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
🚨 NEWS 🚨
Mumbai Indians sign Harvik Desai as replacement for Vishnu Vinod.
Details 🔽 #TATAIPL | #MIvRCB | @mipaltanhttps://t.co/1c48yLCHn8
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2024
आयपीएल 2024 मिनी लिलावात हार्विक देसाई 20 लाखांच्या बेस प्राईसवर उपलब्ध होता. मात्र कोणत्याही फ्रेंचायसी त्याला संघात घेण्यात रूची दाखवली नाही. मात्र स्पर्धा सुरु असताना त्याच्या नशिबाचं दारं खुलं झालं आहे. पण संघात इशान किशन सारखा विकेटकीपर बॅट्समन असताना प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार की नाही? याबाबत शंका आहे. कारण विष्णु विनोद संघात होता मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणं कठीण होतं.
मुंबई इंडियन्स संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, हार्विक देसाई, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, थिलकियो शेफर्ड, थिलकिओ शेफर्ड बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.