MI vs RCB : नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने, गोलंदाजी घेत हार्दिक पांड्या म्हणाला…

आयपीएल 2024 स्पर्धेतील 25वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला. क्षणाचाही विलंब न करता हार्दिक पांड्याने गोलंदाजी स्वीकारली आहे.

MI vs RCB : नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने, गोलंदाजी घेत हार्दिक पांड्या म्हणाला...
| Updated on: Apr 11, 2024 | 7:11 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील तळाशी असलेले दोन दिग्गज संघ आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांना विजय खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघात तीव्र लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघाना स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय खूपच आवश्यक आहे. दुसरीकडे, दोन्ही संघ 32 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात 18 वेळा मुंबई इंडियन्सने बाजी मारली आहे. तर 14 वेळा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा वरचष्मा राहिला आहे. वानखेडेवर मुंबई इंडियन्स 80 सामने खेळली आहे. यात 49 सामन्यात विजय, तर 30 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर एक सामना बरोबरीत सुटला आहे. तर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या मैदानात 10 सामने खेळले आहेत. त्यात मुंबईने 7, तर बंगळुरुने 3 सामन्यात विजय मिळवला आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे.

हार्दिक पांड्या म्हणाला की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करू. ट्रॅकमध्ये काही बदल नाही, पण लाइट्सखाली बॅटिंग करणे अधिक चांगले होऊ शकते. थोडंसं दवही होतं, त्यामुळे पाठलाग हा एक चांगला पर्याय असू शकतो. विजयापूर्वी आणि नंतरचा मूड वेगळा होता. आम्हाला चांगली सुरुवात करावी लागेल, दबाव टाकावा लागेल आणि नंतर खेळ पुढे नेला जाईल. कोणीही 50 धावा न करता आम्ही सर्वोच्च स्कोअर मिळवला, ज्यामुळे तुम्हाला भरपूर आत्मविश्वास मिळतो. पॉवरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी करणे महत्त्वाचे होते. एक बदल असून श्रेयस गोपाल येतो.”

फाफ डू प्लेसिस, “आम्ही गोष्टी बदलण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणून आम्ही आमच्या काही खेळाडूंना, काही नवीन खेळाडूंना संधी दिली आहे . ती संधी स्वीकारणे त्यांच्यावर अवलंबून आहे. आम्ही अशा अवस्थेत सापडलो आहोत जिथे आम्ही चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे, त्यामुळे बदल करण्याची वेळ आली आहे. एक गोष्ट जी महत्त्वाची आहे ती म्हणजे सातत्य राखणे आणि तिथेच आपण निराश झालो आहोत. परंतु आम्हाला माहित आहे की आम्ही हे बदलू शकतो. आम्हीही प्रथम क्षेत्ररक्षण केले असते, या मैदानावर पाठलाग करणे हा उत्तम पर्याय आहे, पण खेळपट्टी चांगली दिसते.”

दोन्ही संघांची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, आकाश मढवाल.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार विषक, मोहम्मद सिराज, आकाश दीप.