IPL 2024, RCB vs PBKS : पंजाब किंग्सने जिंकला नाणेफेकीचा कौल, गोलंदाजीचा निर्णय घेत अशी असेल प्लेइंग 11

आयपीएल 2024 स्पर्धेतील 58 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. या सामन्यानंतर एका संघाचं प्लेऑफचं स्वप्न भंगणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारते याची उत्सुकता लागून आहे. कोणताही संघ जिंकला तरी सर्वकाही जर तरवरच अवलंबून असणार आहे. कारण टॉपच्या तीन संघांचे 14 गुण आधीच झाले आहेत.

IPL 2024, RCB vs PBKS : पंजाब किंग्सने जिंकला नाणेफेकीचा कौल, गोलंदाजीचा निर्णय घेत अशी असेल प्लेइंग 11
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 7:10 PM

आयपीएल स्पर्धेतील प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. हा सामना दोन्ही संघांना महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांचं प्लेऑफचं गणित किचकट असलं तरी विजेत्या संघाच्या आशा मात्र कायम राहतील. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. पंजाब किंग्सने मागचा सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध याच मैदानात गमावला होता. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु मागचे तीन सामने जिंकून पुढे आली आहे. त्यामुळे या सामन्यात तूल्यबळ सामना पाहायला मिळणार आहे. पंजाब आणि आरसीबी या दोन्ही संघांना आतापर्यंत एकदाही जेतेपद मिळवता आलेलं नाही. दरम्यान नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. पंजाबने याच खेळपट्टीवर पुन्हा एकदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात हा निर्णय फसला होता. मात्र तरीही सॅम करनने प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं आहे.

पंजाब किंग्सचा कर्णधार सॅम करन म्हणाला की, ‘बॉलिंगला प्राधान्य देऊ. असे दिसते की त्यांनी विकेटला थोडे पाणी घातले आहे, कदाचित काही लवकर होईल. आरसीबीला लवकर दबावाखाली आणण्याचा विचार आहे. आज आम्ही निवडलेल्या संघासह नवीन चेंडूने विकेट घेण्याचा विचार करत आहोत. आता आमच्यासाठी अगदी सोपे आहे . आमच्यासाठी काही परिणाम हवे आहेत आणि आमचे उर्वरित गेम जिंकू शकतो. लिव्हिंगस्टोन संघात आला आहे. रबाडाऐवजी त्याला घेतलं आहे. आमची ताकद आमची फलंदाजी आहे.’

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने सांगितलं की, “आम्हीही गोलंदाजी घेतली असती. आमच्यासाठी एक उत्तम बदल झाला. मागील काही गेममध्ये आम्ही क्लिनिकल आहोत. फोकस सारखाच ठेवला आहे, समोर जास्त काही नाही. त्याच पद्धतीने आम्हाला खेळायचे आहे. लॉकी फर्ग्युसनला संघात घेतलं असून मॅक्सवेलला बाहेर काढलं आहे.”

दोन्ही संघांची प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, महिपाल लोमरोर, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन.

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, शशांक सिंग, सॅम कुरन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, आशुतोष शर्मा, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग, विद्वत कवेरप्पा.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.