RR vs MI : हार्दिकने राजस्थान विरुद्धच्या पराभवासाठी कुणाला जबाबदार ठरवलं?

Hardik Pandya RR vs MI IPL 2024 : हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा आयपीएलच्या 17 व्या मोसमातील राजस्थान विरुद्धचा हा दुसरा आणि एकूण पाचवा पराभव ठरला. हार्दिकने पराभवाचं खापर कुणावर फोडलं?

RR vs MI : हार्दिकने राजस्थान विरुद्धच्या पराभवासाठी कुणाला जबाबदार ठरवलं?
hardik pandya post match reaction,
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Apr 23, 2024 | 1:06 AM

संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमात सातवा विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सने 38 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला. मुंबईने विजयासाठी दिलेलं 180 धावांचं आव्हान राजस्थानने 18.4 ओव्हरमध्ये 1 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं. यशस्वी जयस्वाल राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. यशस्वीने मुंबई विरुद्ध नाबाद शतकी खेळी केली. यशस्वीने नाबाद 104 धावा केल्या. तर संजू सॅमसनने 38 धावांचं योगदान दिलं. तर जॉस बटलर 34 रन्स करुन माघारी परतला. राजस्थानचा हा या मोसमातील मुंबई विरुद्धचा दुसरा विजय ठरला. त्याआधी राजस्थानने 1 एप्रिल रोजी मुंबईला वानखेडे स्टेडियममध्ये पराभूत केलं होतं. राजस्थानचा हा या हंगामातील सातवा विजय ठरला. तर मुंबईचा हा पाचवा पराभव ठरला. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने पराभवासाठी कुणाला जबाबदार ठरवलं? जाणून घेऊयात.

हार्दिक काय म्हणाला?

“आम्ही स्वतःला लवकर अडचणीत आणलं. तिलक वर्मा आणि नेहल वढेरा या दोघांनी अप्रतिम बॅटिंग केली. आम्ही शेवट गोड करु शकलो नाहीत. त्यामुळे आम्हाला 10-15 धावा कमी पडल्या”, असं हार्दिकने नमूद केलं.

“आम्हाला स्टंपनुसार अचूक बॉलिंग करावी लागेल . मला असं नाही वाटत की आजचा दिवस आमच्यासाठी सर्वोत्तम होता. सामन्यानंतर खेळाडूंकडे जाण्याची ही योग्य वेळ नाही. प्रत्येक जण प्रोफेशनल आहे. त्यांना काय करायचं आणि काय नाही? हे त्यांना अचूक माहितीय”असं पंड्याने सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेंझेंटेशनमध्ये म्हटलं.

“खेळातून आपण काय शिकू शकतो तर ज्या चुका केल्या आहेत त्या दुरुस्त करायच्या. तसेच केलेल्या चुकांची पुन्हा पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यायची. प्रगती खूप महत्वाची आहे. टीम आणि वैयक्तिक म्हणून आम्हाला आमच्या चुका मान्य करावा लागतील. आम्ही त्यात सुधारणा करु”, असं हार्दिकने नमूद केलं.

“तसेच मला खेळाडूंचं समर्थन करणं आवडतं. तसेच कायम चांगलं खेळणं, प्लानवर कायम राहणं आणि चुका होणार नाहीत, याकडे लक्ष देऊ”, असंही हार्दिक म्हणाला.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला आणि जसप्रीत बुमराह.