IPL 2024: सनरायझर्स हैदराबादने कॅप्टननंतर आता बदलली जर्सी

आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी फ्रेंचायसीच्या जर्सींनी लक्ष वेधून घेतलं आहे. काही फ्रेंचायसी आहे तीच जर्सी ठेवली आहे. तर काहींना किंचितसा बदल केला आहे. पण सनरायझर्स हैदराबादची जर्सा पाहून काहीतरी वेगळंच वाटत आहे. कर्णधारपदानंतर हैदराबादनं जर्सीही नवीन ढंगात सादर केली आहे.

IPL 2024: सनरायझर्स हैदराबादने कॅप्टननंतर आता बदलली जर्सी
IPL 2024: सनरायझर्स हैदराबादच्या जर्सीची जोरदार चर्चा, बघा तुम्हा हा बदल कसा वाटतो?
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 4:12 PM

मुंबई : मागच्या दोन पर्वात सनरायझर्स हैदराबादची स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे या संघात वारंवार बदलाचे वारे वाहताना पाहिलं आहे. डेविड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने एकदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. पण त्यानंतर पुन्हा एकदा सूर गवसणं काही शक्य झालं नाही. त्यामुळे डेविड वॉर्नरला कर्णधारपदावरून दूर केलं. इतकंच काय तर त्याला रिलीजही करून टाकलं. त्यानंतर इतर खेळाडूंकडे जशी गरज तशी कर्णधारपदाची धुरा सोपवली गेली. काही दिवसांपूर्वी एडन मार्करम याच्याकडून नेतृत्वाची धुरा काढून पॅट कमिन्सकडे सोपवली आहे. त्यामुळे संघात उलथापालथ होत असताना नवी जर्सी समोर आली आहे. या बदलाचा भाग आणि खेळाडूंना प्रेरणा मिळावी या हेतून नवी जर्सी सादर केली आहे. या पर्वात सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू नव्या जर्सीसह उतरणार आहेत.

सनरायझर्स हैदराबादच्या जर्सीकडे बघता क्षणी आगीचं प्रतिक दिसून येईल. ज्वाला निघत असल्याचा भस होईल.आकर्षक आणि दोलायमान डिझाईनसह ही जर्सा सादर करण्यात आली आहे. नवी जर्सीसह स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा फोटो सनरायझर्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच एक व्हिडिओही शेअर केला. फायर किट, फायर प्लेयर आयपीएल 2024 साठी ऑल सेट असे शीर्षक दिलं आहे.

सनरायझर्स हैदराबादने कर्णधारपदाची धुरा ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक विजेता कॅप्टन पॅट कमिन्सकडे सोपवली आहे. न्यूझीलंडने माजी फिरकीपटू डॅनियल व्हिटोरीची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. 2016 मध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या सनरायझर्स संघाचे नशिब यावेळच्या बदलांमुळे बदलणार का? हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.

हैदराबादचा संपूर्ण संघ

अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम , मार्को जॅनसेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेनरिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी. नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, उपेंद्रसिंग यादव, उमरान मलिक, नितीश कुमार रेड्डी, फजलहक फारुकी, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड, वानिंदू हसरंगा, पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनाडकट, आकाश सिंग, जाथवेध सुब्रमण्यन.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.