AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 3 May 2024 : सोन्यासह चांदीने दाखवली चमक; अशा महागल्या किंमती

Gold Silver Rate Today 3 May 2024 : या महिन्यातील सोने आणि चांदीने पहिली दरवाढ नोंदवली. मार्चपासून ते एप्रिलपर्यंत मौल्यवान धातूंनी दरवाढीचा कहर केला होता. एप्रिलच्या अखेरच्या सत्रात पडझडीला सुरुवात झाली. ती आठवड्याच्या सुरुवातीला कायम होती. आता सोने-चांदीला पुन्हा चमक आली आहे.

Gold Silver Rate Today 3 May 2024 : सोन्यासह चांदीने दाखवली चमक; अशा महागल्या किंमती
सोने आणि चांदीने घेतली उसळी
| Updated on: May 03, 2024 | 8:34 AM
Share

गेल्या तीन दिवसांच्या आरामाला विराम देत सोने आणि चांदीने पुन्हा जोरदार उसळी नोंदवली. मार्च आणि एप्रिल महिन्यात दोन्ही धातूंनी दरवाढीचे नवनवीन उच्चांक गाठले. एप्रिल महिन्याच्या अखेरच्या सत्रात सोने नरमले. तर गेल्या 15 दिवसांपासून चांदीला मोठी कमाल दाखविता आली नाही. मे महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही धातूंनी नरमाईचा सूर आळवला होता. आता किंमती पु्न्हा वधारल्या. काय आहेत सोने-चांदीची किंमत (Gold Silver Price Today 3 May 2024 )

सोन्याने घेतली उसळी

या आठवड्याच्या सुरुवातीला 29 एप्रिल रोजी सोने 300 रुपयांनी स्वस्त झाले. तर 30 एप्रिल रोजी भाव जैसे थे होते. 1 मे रोजी सोने 1,000 रुपयांनी दणकावून आपटले.2 मे रोजी सोने 700 रुपयांनी उसळले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी वधारली

एप्रिल महिन्याच्या 17 तारखेपासून चांदीला फार मोठी कमाल दाखवता आली नाही. चांदीने नरमाईचे धोरण स्वीकारले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला 29 एप्रिल रोजी किंमती स्थिर होत्या. तर 30 एप्रिल रोजी चांदी किलोमागे 500 रुपयांनी कमी झाली. 1 मे रोजी किंमती स्थिर होत्या. 2 मे रोजी भाव 500 रुपयांनी वाढले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 83,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी स्वस्त झाली. असोसिएशनने अजून किंमती अपडेट केलेल्या नव्हत्या. 24 कॅरेट सोने 71,327 रुपये, 23 कॅरेट 71,041 रुपये, 22 कॅरेट सोने 65,336 रुपये झाले. 18 कॅरेट 53,495 रुपये, 14 कॅरेट सोने 41,726 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 79,719 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव...
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव तुफान चर्चेत
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, वडिलांचा जबाब...
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, तिच्या वडिलांचा जबाब... नेमकं काय घडणार?
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा 'सामना'त खळबळजनक दावा
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एक..
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एकच प्रश्न...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं आमिष दाखवलं की...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं विचित्र आमिष दाखवलं की पीडित...
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं...
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं पद धोक्यात
‘मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली?’ रोहित पवारांचा MPSC ला
मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली? MPSC प्रकरणात नवा ट्विस्ट
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?