
IPL 2024 Auction : गुजरात टायटन्सचा मागच्या सीजनचा कर्णधार हार्दिक पांड्या आता मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. मुंबईने त्याला आपल्या संघात परत घेतले असून त्यालाच कर्णधार देखील केले आहे. गुजरात टायटन्समध्येही हार्दिक पांड्या कर्णधार होता. त्याच्या जागी कोणाला घ्यावी असा प्रश्न फ्रेंचायजीपुढे होता. या मिनी लिलावात गुजरात टायटन्सने चांगले खेळाडू खरेदी केले आहेत. IPL 2024 च्या लिलावासाठी अनकॅप्ड भारतीय खेळाडूंची नावे मागवण्यात आली तेव्हा गुजरात टायटन्सने शाहरुख खानला फिनिशरच्या भूमिकेसाठी निवडले. पंजाब किंग्जनेही शाहरुखसाठी खूप प्रयत्न केले, पण शेवटी गुजरात टायटन्सने त्याला विकत घेतले.
शाहरुख खान हा पंजाब किंग्जकडून खेळत होता. त्याला 9 कोटी रुपयांना विकत घेतले होते, पण त्याला काही संधी न मिळाल्याने त्याला रिलीज केले गेले. पण आज पुन्हा पंजाबने त्याच्यासाठी बोली लावली होती. पण पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील रस्सीखेच बराच काळ सुरू राहिली. पण जेव्हा बोली 7.40 कोटी रुपयांवर पोहोचली तेव्हा पंजाब किंग्सने माघार घेतली आणि गुजरात टायटन्सने त्यांना आपल्या संघात घेतले.
शाहरुख खान गुजरात टायटन्सकडून खेळताना मधल्या फळीत खेळेल. त्यामुळे हार्दिक पांड्याची जागा भरुन निघेल. गुजरात टायटन्सकडे राहुल तेवतिया आणि डेव्हिड मिलर तसेच राशिद खान आहेत जे नंतरच्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी करू शकतात. आणखी एक खेळाडू आल्याने संघ मजबूत झाला आहे. शाहरुख खानने 22 सामन्यात 273 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट १३७ होता.शाहरुख खान आयपीएलच्या पुढील सीझनमध्ये नव्या टीमसोबत खेळताना दिसणार आहे. गुजरात टायटन्ससाठी त्याची कामगिरी कशी होते हे पाहायचे आहे.