
आयपीएल 2025 स्पर्धेच्या 37व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे आमनेसामने आहेत. नवी चंदीगढच्या महाराजा यादविंदर सिंग स्टेडियममध्ये हा सामना होत आहे. या स्पर्धेत यापूर्वी हे दोन्ही संघ भिडले आहे. बंगळुरुच्या मैदानात झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने विजय मिळवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने फक्त 96 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पंजाब किंग्सने 11 चेंडू आणि 5 गडी राखून पूर्ण केलं. आरसीबीकडून टिम डेविडने 26 चेंडूत 50 धावा काढून लढा देण्याचा प्रयत्न केला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने लागला. कर्णधार रजत पाटिदारने प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं आहे. आरसीबीचा कर्णधार रजत पाटिदार म्हणाला की, ‘आपण प्रथम गोलंदाजी करणार आहोत. विकेट चांगली दिसतेय, फारसा बदल होणार नाही. दुसऱ्यांदा फलंदाजी केल्याने खेळ आणि विकेटबद्दल अधिक स्पष्टता येईल. आम्ही स्थळे पाहत नाही आहोत, फक्त चांगले क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत आहोत. लिवीऐवजी शेफर्ड येतो.’
पंजाब किंग्सचा कर्णधार म्हणाला की, ‘आम्हालाही गोलंदाजी करायची होती. दिवसाच्या शेवटी तुम्हाला नेहमीच परिस्थितीनुसार जुळवून घ्यावे लागते. स्वतःला थोडा वेळ देणे महत्वाचे आहे, चेंडू कसा हलतो ते पाहणे. हा आमच्यासाठी दुपारचा पहिला सामना आहे. आशा आहे की आम्ही बोर्डवर चांगला धावसंख्या करू. आम्हाला मिळालेला पाठिंबा विशेषतः या स्टेडियममधील शेवटच्या सामन्यात, उत्कृष्ट होता. त्या संघासोबत मैदानात उतरणार आहोत’
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णदार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
पंजाब किंग्ज इम्पॅक्ट प्लेयर: हरप्रीत ब्रार, विजयकुमार विशक, सूर्यांश शेडगे, ग्लेन मॅक्सवेल, प्रवीण दुबे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, कृणाल पांड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जोश हेजलवुड, यश दयाल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इम्पॅक्ट प्लेयर: देवदत्त पडिक्कल, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग