AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 Delhi Capitals vs Gujarat Titans Live Streaming : दिल्लीसाठी अटीतटीचा सामना, गुजरात प्लेऑफमध्ये पोहचणार?

Delhi Capitals vs Gujarat Titans, Live Streaming : रविवारी 18 मे रोजी दिल्ली विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रंगतदार सामना होणार आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. दिल्लीकडे या सामन्यात पराभवाची परतफेड करण्याचीही संधी आहे.

IPL 2025 Delhi Capitals vs Gujarat Titans Live Streaming : दिल्लीसाठी अटीतटीचा सामना, गुजरात प्लेऑफमध्ये पोहचणार?
DC vs GT IPL 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 18, 2025 | 12:04 AM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमात रविवारी 18 मे रोजी डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. अक्षर पटेल याच्याकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर शुबमन गिल गुजरातचं नेतृत्व करणार आहे. प्लेऑफच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना आहे. गुजरातकडे हा सामना जिंकून प्लेऑफमधील प्रवेश निश्चित करण्याची संधी आहे. तर दिल्लीला आव्हान कायम राखण्यासाठी हा सामना कोणत्याही स्थिती जिंकावा लागणार आहे. अशात या सामन्यात चाहत्यांना चांगलीच चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

दिल्ली विरुद्ध गुजरात दुसऱ्यांदा भिडणार

दिल्ली आणि गुजरात दोन्ही संघांची आमनेसामने येण्याची ही या हंगामातील दुसरी वेळ ठरणार आहे. याआधी गुजरातने दिल्लीवर 19 एप्रिलला 7 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला होता. त्यामुळे दिल्ली आता या सामन्यात विजयी होत गेल्या पराभवाचा हिशोब चुकता करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दिल्ली विरुद्ध गुजरात सामना केव्हा?

दिल्ली विरुद्ध गुजरात सामना रविवारी 18 मे रोजी होणार आहे.

दिल्ली विरुद्ध गुजरात सामना कुठे?

दिल्ली विरुद्ध गुजरात सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे.

दिल्ली विरुद्ध गुजरात सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दिल्ली विरुद्ध गुजरात सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

दिल्ली विरुद्ध गुजरात सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?

दिल्ली विरुद्ध गुजरात सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह मॅच पाहायला मिळेल.

गुजरात दुसऱ्या स्थानी

दरम्यान गुजरात आणि दिल्लीचा हा या मोसमातील प्रत्येकी 12 वा सामना आहे. गुजरातने 11 पैकी 8 सामने जिंकले आहेत. गुजरात 16 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तर दिल्लीला 11 पैकी फक्त 6 सामने जिंकता आले आहेत. तर 4 वेळा पराभव झाला आहे. तसेच 5 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्धचा सामना हा पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दिल्लीच्या खात्यात 13 पॉइंट्स आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...