
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 32 वा सामना हा बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल हा सुपर ओव्हरनंतर स्पष्ट होणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. दिल्ली कॅपिट्ल्सने अरुण जेटली स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 189 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दिल्लीच्या गोलंदाजांनी चिवटपणे या धावांचा बचाव केला आणि सामना बरोबरीत रोखण्यात यश मिळवलं. त्यामुळे आता सुपर ओव्हरनंतर कोणता संघ यशस्वी ठरतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. अशाप्रकारे हा या मोसमातील टाय झालेला पहिलावहिला सामना ठरला.
यशस्वी जयस्वाल आणि नितीश राणा या युवा फलंदाजांनी अर्धशतकी खेळी आणि राजस्थानला विजयाजवळ आणून ठेवलं. त्यामुळे राजस्थान जिंकेल, अशी स्थिती होती. मात्र दिल्लीच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. दिल्लीच्या गोलंदाजांनी चिवट बॉलिंग केल्याने सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत पोहचला. राजस्थानकडून मैदानात ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायर ही जोडी होती. तर दिल्लीकडून मिचेल स्टार्क याने 20 वी ओव्हर टाकली. राजस्थानला शेवटच्या ओव्हरमध्ये 9 धावांची गरज होती. एक एक चेंडू कमी होत होता. तर दुसर्या बाजूला थरार वाढत होता. राजस्थानला शेवटच्या बॉलवर 2 धावांची गरज होती. मात्र राजस्थान 2 धावा करण्यात अपयशी ठरली.
ध्रुव जुरेलने शेवटच्या बॉलवर फटका मारला. ध्रुवने 1 धाव पूर्ण केली. त्यानंतर ध्रुव दुसऱ्या धावेसाठी स्ट्राईक एंडच्या दिशेने धाव घेतली. मात्र अक्षर पटेल याने अचूक थ्रो केला. अक्षरचा हा थ्रो विकेटकीपर केएल राहुल याने अचूक पकडला आणि ध्रुवला रन आऊट केलं. अशाप्रकारे सामना 20 ओव्हरनंतर 4 बाद 188 धावांवर बरोबरी सुटला आणि या 18 व्या सिजनमधील पहिली मॅच टाय झाली.
18 व्या ओव्हरमधील पहिली सुपरओव्हर
We are headed to a SUPER OVER! 🤯
Stay tuned folks!
Updates ▶ https://t.co/clW1BIPA0l#TATAIPL | #DCvRR | @DelhiCapitals | @rajasthanroyals pic.twitter.com/x6kwToldK4
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2025
राजस्थानसाठी यशस्वी जयस्वाल आणि नितीश राणा या दोघांनी सर्वाधिक आणि प्रत्येकी अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी 51-51 धावा केल्या. रियान पराग याने 8 धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसन याने 31 धावांचं योगदान दिलं. शिमरॉन हेटमायर 15 धावांवर नाबाद परतला. तर ध्रुव जुरेल राजस्थानच्या डावातील शेवटच्या चेंडूवर 26 धावांवर रनआऊट झाला आणि सामना बरोबरीत सुटला. दिल्लीकडून कुलदीप यादव, मिचेल स्टार्क आणि कर्णधार अक्षर पटेल या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.