
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी आयपीएलच्या 18 व्या मोसमातील अंतिम सामन्यात चिवट बॉलिंग करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 200 धावा करण्यापासून यशस्वीरित्या रोखलं आहे. आरसीबीला पंजाबच्या गोलंदाजांसमोर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 190 रन्सच करता आल्या. त्यामुळे आता पंजाबसमोर आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी 191 धावांचं आव्हान आहे. आता पंजाब हे आव्हान पूर्ण करत 18 वर्षांची प्रतिक्षा संपवणार की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु इतिहास घडवणार? हे आता पुढील 20 ओव्हरनंतर स्पष्ट होणार आहे.
पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आरसीबीच्या पहिल्या 7 फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यापैकी एकालाही अर्धशतक झळकावता आलं नाही. त्यामुळे पंजाब 200 पर्यंत पोहचण्यात अपयशी ठरली. आरसीबीने पावरप्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 55 रन्स जोडल्या. त्यानंतर बंगळुरुने 7 ते 17 ओव्हरदरम्यान 4 विकेट्स गमावून 113 रन्स जोडल्या. तर अखेरच्या 2 षटकांमध्ये पंजाबने 22 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. त्यापैकी 3 विकेट्स या अर्शदीप सिंग याने 20 व्या ओव्हरमध्ये घेतल्या. त्यामुळे आरसीबीला 190 रन्सवर रोखण्यात यश मिळवलं.
आरसीबीसाठी फिल सॉल्ट याने 9 बॉलमध्ये 16 रन्स केल्या आणि मैदानाबाहेरचा रस्ता धरला. मयंक अग्रवाल याने 24 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर विराट कोहली आणि रजत पाटीदार जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 40 रन्स जोडल्या. रजत 16 चेंडूत 26 रन्स करुन माघारी परतला. दुसऱ्या बाजूला विराट कोहली चांगला रंगात खेळत होता. त्यामुळे आता विराट निश्चित अर्धशतकी खेळी करणार, असं वाटत होतं. मात्र तसं होऊ शकलं नाही. विराटच्या रुपात आरसीबीने चौथी विकेट गमावली. विराटने आरसीबीसाठी सर्वाधिक धावा केल्या. विराटने 35 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 43 धावा केल्या.
विराटनंतर बरोबर 2 ओव्हरनंतर लियाम लिविंगस्टोन माघारी परतला. लियामने 25 धावा केल्या. विकेटकीपर बॅट्समन जितेश शर्मा मोठे फटके मारत होता. त्यामुळे आरसीबीच्या आशा वाढल्या. जितेशला मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र विजयकुमार वैशाखने जितेशला रोखण्यात यश मिळवलं. जितेशने 2 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 10 बॉलमध्ये 24 रन्स केल्या. त्यामुळे आरसीबीची स्थिती 17.4 ओव्हरनंतर 6 आऊट 171 अशी झाली.
20 व्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स
A final-over spell written in fire 🔥
Arshdeep Singh pulled things back for #PBKS with 3️⃣ crucial blows ❤
Scorecard ▶ https://t.co/U5zvVhbXnQ#TATAIPL | #RCBvPBKS | #Final | #TheLastMile | @arshdeepsinghh pic.twitter.com/a7Z1i062Ug
— IndianPremierLeague (@IPL) June 3, 2025
त्यानंतर आरसीबीने 19 व्या ओव्हरमध्ये एकही विकेट गमावली नाही. मात्र अर्शदीप सिंह याने त्याच्या कोट्यातली चौथ्या आणि आरसीबीच्या डावातील 20 व्या ओव्हरमध्ये एकूण 3 विकेट्स घेतल्या. अर्शदीपने रोमरियो शेफर्ड याने 17 धावा केल्या. कृणाल पंड्या याने 4 धावांचं योगदान दिलं. तर भुवनेश्वर कुमार याने 1 धाव केली. पंजाबसाठी अर्शदीप व्यतिरिक्त कायले जेमिन्सन यानेही 3 विकेट्स मिळवल्या. तर अझमतुल्लाह ओमरझई, विजयकुमार वैशाख आणि युझवेंद्र चहल या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.